शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मी सत्तेमध्ये नाही, पण सत्ताधारी पक्षात, भास्कर जाधव शिवसेनेवर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 22:10 IST

ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर नाराजांची संख्या वाढतच चालली आहे.

मुंबईः ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर नाराजांची संख्या वाढतच चालली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काही आमदारांनी मंत्रिपद न मिळाल्यानं राजीनामा देण्याची भूमिका घेतलेली होती, परंतु पक्षानं मन वळविल्यानंतर त्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या भास्कर जाधवांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. सत्तेमध्ये मी नाही, पण सत्ताधारी पक्षात मी आहे. वाटेल ते कौशल्य पणाला लावेन, पण विकास मात्र थांबू देणार नाही, असं एका कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना ते उद्देशून म्हणाले आहेत.मी नाराज नाही. पण मला आश्चर्याचा धक्का बसला. विधानसभेत जे सर्व आमदार आहेत, त्या सर्वात जास्त वेळा निवडून आलेला आमदार मी आहे. मला प्रशासनाचा प्रदीर्घ काळ अनुभव आहे. मला उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळालेला आमदार आहे. मला विधिमंडळ प्रशासनाचा अनुभव आहे, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मला पैशाचा, सत्तेचा, लाल दिव्याच्या गाडीचा अजिबात मोह नाही. उद्धव ठाकरे यांनी काही गोष्टींचे आश्वासन दिलं होतं. त्या गोष्टी जगजाहीर करायच्या नसतात. मला मंत्रिपद मिळालं नाही, पण त्यात मी कुठे कमी पडतो, पूर्वीची कटुता संपली की नाही, अशा सर्व शंका मनात होत्या. मी उद्धव ठाकरेंकडे वेळ मागितली आहे. त्यांनी वेळ दिल्यानंतर मी या सर्व शंका त्यांना विचारणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.  

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार