शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दहा भुजबळ, दहा खडसे एकत्र आले तरी मी त्यांना पुरून उरेन- दमानिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 19:36 IST

एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आज अंजली दमानिया जळगावमध्ये जबाब नोंदवण्यासाठी आल्या होत्या.

जळगाव:एकनाथ खडसे हे सध्या त्यांच्या समर्थकांमार्फत माझ्याविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करत आहेत. काही दिवसांपूर्वीच खडसे यांनी छगन भुजबळ यांना सोबत घेऊन लढण्याची घोषणा केली होती. मात्र, असे दहा एकनाथ खडसे आणि दहा छगन भुजबळ एकत्र आले तरी मला फरक पडत नाही. कारण माझी लढाई सत्याची आहे, असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आज अंजली दमानिया जळगावमध्ये जबाब नोंदवण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी दमानिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दमानिया यांनी म्हटले की, पराभव झाल्याने आणि सत्ता गेल्यामुळे एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे खडसे माझ्याविरुद्ध बेछूट आरोप करत सुटले आहेत. स्वत:च्या समर्थकांकरवी खडसे माझ्याविरुद्ध दाखल करत आहेत. काही दिवसांपूर्वीच खडसे यांनी आता आपण भुजबळांना सोबत घेऊन लढू असे म्हटले होते. या दोन्ही नेत्यांचं अस्तित्व संपल्यानंतर ते एकत्र येत आहेत. हे दोन्ही नेते ओबीसींसाठी नाही तर माझ्या विरुद्ध लढण्यासाठी एकत्र येत आहेत. मात्र, त्यामुळे मला काही फरक पडणार नाही. मी दहा भुजबळ आणि दहा खडसे यांना पुरून उरेल, असे अंजली दमानिया यांनी सांगितले.    

टॅग्स :anjali damaniaअंजली दमानियाEknath Khadaseएकनाथ खडसेChhagan Bhujbalछगन भुजबळ