शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

मी हाय मुंबईच्या वर्साेव्याचा कोली, आणलीया दिंडी, चंद्रभागेच्या किनारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 13:16 IST

कोळी बांधवांची वारकरी मंडळाची स्थापना; दिंडीत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या घरात वारीची परंपरा 

ठळक मुद्देआषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून मानाच्या पालख्या दाखलअलीकडच्या काही वर्षांत छोट्या-छोट्या दिंड्याही वारीला येत आहेतवर्सोवा येथील हरिविजय वारकरी मंडळाची दिंडी गेल्या १९ वर्षांपासून पंढरपूरला येत आहे

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी मुंबईच्या वर्सोवा येथून कोळी बांधवांची दिंडी पंढरपुरात दाखल झाली आहे. डोक्यावर पांढरी टोपी, केशरी आणि पांढºया रंगाचा टि शर्ट, बरमुडा अशी या दिंडीतील वारकºयांची वेशभूषा आहे. पुढील चार दिवस हे वारकरी पंढरपूर मुक्कामी आहेत. 

आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून मानाच्या पालख्या दाखल होतात. अलीकडच्या काही वर्षांत छोट्या-छोट्या दिंड्याही वारीला येत आहेत. वर्सोवा येथील हरिविजय वारकरी मंडळाची दिंडी गेल्या १९ वर्षांपासून पंढरपूरला येत आहे. दिंडीचालक प्रल्हाद रत्ने म्हणाले, वर्सोवातील ३५ ते ४० कोळी बांधवांनी हरिविजय वारकरी मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून सन २००० पासून पायी दिंडीला सुरुवात करण्यात आली. यंदाच्या वर्षी प्रल्हाद द्वारकानाथ टिकले बुवा, नितीन भाटे बुवा, मंगेल चिखले बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली २५ जून रोजी दिंडी निघाली. सुरुवातीला तळेगावपर्यंत पाऊस होता. पण माऊलींचे बोलावणे होते म्हणून ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता चालत राहिले. दररोज किमान ४० किलोमीटरचा प्रवास व्हावा, असा आमचा प्रयत्न असतो. मध्यरात्री अडीचच्या सुमाराला आम्ही चालायला सुरुवात करतो. पहाटे नाष्टा केल्यानंतर सकाळी १० पर्यंत पहिले भोजन होते. ७ जुलै रोजी आम्ही पंढरपुरात पोहोचलो. 

रत्ने म्हणाले, वर्षाला आठ महिने कोळी बांधव समुद्रात मासेमारी करतात. दिंडीत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या घरात वारीची परंपरा आहे. आज मुंबईपासून पंढरपूरपर्यंत वाहतुकीच्या बºयाच सुविधा आहेत. पण माऊलींचं बोलावणं असतं म्हणून चालतच येतो. खांद्यावर भगवी पताका, मुखात हरिनामाचा गजर करीत चाललो की, कसला थकवा आणि कसला त्रास. आस असते फक्त विठुरायाच्या दर्शनाची. 

पंढरपुरातील पांडुरंग भवनाच्या समोर एका मंदिरात आठ दिवस मुक्काम करतो. पंढरीत दाखल झाल्यानंतर यंदा तीन तास रांगेत थांबून विठुरायाचं दर्शन घेतलं. आषाढी एकादशीचा सोहळा होईपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत. 

वाटेत मंदिरांमध्ये असतो मुक्काम - वर्सोव्यातील मंदिरातून दिंडीने प्रस्थान ठेवले की, पहिला मुक्काम घाटकोपर येथील राम मंदिरात होतो. तिथून बेलापूर येथील राम मंदिर, पनवेलमध्ये मार्केट यार्डातील बालाजी मंदिर, माथेरान मार्गावरील चौकात असलेले माऊलींचे मंदिर, खोपोली येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, लोणावळा येथील एकविरा मंदिर, तळेगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, देहू, आळंदी येथे गणेशनाथ महाराज संस्था, दिघी, हडपसर येथील मंगल कार्यालय, दिवेघाटातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, जेजुरी येथील खंडोबा मंदिर, बारामती जिंती खंडोबा मंदिर, फलटण येथील राम मंदिर, बरड येथील मंगल कार्यालय, नातेपुतेच्या पुढे संतोषी माता मंदिर, माळशिरस येथील हनुमान मंदिर, वेळापूरपासून तीन किमीवरील मराठी शाळेतील मुक्कामानंतर पंढरपुरात दाखल. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा