शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मी आक्रमक आहे, उद्धव यांच्यासारखा मेंगळट नाही, राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 21:44 IST

कोकणचे सुपुत्र व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मी आक्रमक आहे, उद्धव यांच्यासारखा मेंगळट नाही, असं म्हणत राणेंनी उद्धव यांना लक्ष्य केलं आहे. ते डोंबिवलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

डोंबिवली, दि. 28 - कोकणचे सुपुत्र व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मी आक्रमक आहे, उद्धव यांच्यासारखा मेंगळट नाही, असं म्हणत राणेंनी उद्धव यांना लक्ष्य केलं आहे. ते डोंबिवलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.ते म्हणाले, उद्धव कुचक्या मनाचा, रडीचा गेम खेळतोय, उद्धव ठाकरेंनी जेवढा त्रास वडिलांना दिला तेवढा कोणी दिला नसेल. मराठी माणसावर अन्याय व्हायला नको, यासाठी सेनेची स्थापना केलीय. उद्धव ठाकरे जी सेना चालवतात ती आमच्या आक्रमकतेमुळेच उभी राहिलीय. साहेबांनी मराठी माणसाचा रुबाब वाढवला, आताचे दलाल फक्त व्यवसाय करतात, असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टीका केलीय. साहेबांचे माझे वाद नव्हते, माझा वाद उद्धव ठाकरेंशी होता.2005ला मी केवळ उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेना सोडली, अशी कबुलीही नारायण राणेंनी दिली आहे. सेनेच्या मंत्र्यांना धड सभागृहात बोलता येत नाही, माझ्या मनात आलं तर सगळ्यांच्या कुंडल्या काढेन, असं म्हणत राणेंनी शिवसेना नेत्यांवरही टीका केली आहे. माझ्या आयुष्यात मला आक्रमकतेमुळे पदे मिळाली, राज्याच्या राजकारणात जे नाव कमावलं ते कोकणी माणसामुळेच कमावलं आहे, कोकणातला विकास थांबलाय म्हणून राजीनामा दिलाय, मी मैदानात खेळणारा आहे, बाल्कनीत नाही, असंही राणे म्हणाले आहेत.कुठलाही काँग्रेस मुख्यमंत्री आला की केवळ नारायण राणेला विरोध, केवळ राणे कुठं जातात काय करतात याकडे लक्ष, मुख्यमंत्रिपदासाठी मला 48 आमदारांनी पसंती दिली, पण नाव अशोक चव्हाणांचं जाहीर केलं,  महिने कसेही जातील, पण तीन वर्षे झाली, काही नाही. मी सेना सोडली तेव्हा काँग्रेस नेत्यांनी मला सहा महिन्यांत मुख्यमंत्री करतो असं सांगितलं होतं, मात्र काँग्रेसनं ते आश्वासन पाळलं नाही. माझ्यावर काँग्रेस अन्याय करू शकत नाही, फक्त फसवणूक केली, राज्यात काही करायचे असल्यास काँग्रेसमध्ये राहून करता येणार नाही म्हणून राजीनामा दिला, मराठा आरक्षण मिळवून देणारच आहे, येत्या 1 तारखेला 1 वाजता माझी दिशा जाहीर करणार असल्याचंही राणेंनी यावेळी स्पष्ट केलं आहे.