शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

हायपरलूपद्वारे पुणे ते मुंबई प्रवास आता 20 मिनिटांत होणार पूर्ण- रिचर्ड ब्रॅन्सन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 03:09 IST

पुणे-मुंबई दरम्यान हायपरलूप या अतिजलद प्रवासाची सुविधा विकसित करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि लॉस एंजेल्स येथील हायपर लूप कंपनीबरोबर सामंजस्य करार झाला.

मुंबई- पुणे-मुंबई दरम्यान हायपरलूप या अतिजलद प्रवासाची सुविधा विकसित करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि लॉस एंजेल्स येथील हायपरलूप कंपनीबरोबर सामंजस्य करार केला. या करारावर व्हर्जिन समूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन यांनी भाष्य केलं आहे. पुणे ते मुंबई हा प्रवास 20 मिनिटांत पूर्ण होणार आहे. पुण्याहून मुंबई आणि नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास 20 मिनिटांत शक्य होणार असून, त्यासाठी मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळासाठी हायपरलूप प्रवासी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. देशातील प्रमुख शहरे दोन तासांत हायपरलूपने जोडली जाणार असून, त्याचा दरवर्षी 15 कोटी प्रवाशांना फायदा होणार आहे, असंही रिचर्ड ब्रॅन्सन म्हणाले आहेत. 

हायपर लूप ही अत्याधुनिक प्रणालीहायपर लूप हा वाहतुकीचा नवीन प्रकार असून, कमी दाबाच्या निर्वात पोकळीमधून इलेक्टो-चुंबकीय प्रणोदकांमधून वाहतूक केली जाते. या प्रणालीद्वारे एका तासात १ हजार ८० कि. मी. वेगानेही प्रवास करता येतो. हायपरलूप ही कार्यक्षम, सुरक्षित व विश्वासार्ह वाहतूक प्रणाली आहे. पीएमआरडीएने केलेल्या सामंजस्य करारानुसार पुणे-मुंबई विभागातील मार्गांचे पूर्व व्यवहार्यता अभ्यास (प्री-फिजिबिलीटी स्टडी)अहवाल तयार करून हायपरलूप आधारित प्रवासी ट्रॅफिक सिस्टीम कार्यान्वित करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने तपासणी करून अहवाल तयार करण्यासाठी हा करार करण्यात आला. सध्या हायपर लूप आधारित ट्रांजिट प्रोजेक्टस नेदरलँडमध्ये, अबू धाबी ते दुबई आणि स्टॉकहोम ते हेलसिंकी येथे चालू आहे. भारतात महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांच्यात करार झाले आहेत. विजयवाडा आणि अमरावती या शहरांसाठी पूर्व व्यवहार्यता अभ्यास अहवाल तयार करण्यात आला आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई