शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हुसैनीवाला इमारत धोकादायक होती; पालकमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 12:02 IST

मुंबई, दि. 31- मुंबईतील जेजे मार्ग परिसरात गुरूवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हुसैनीवाला ही पाच मजली इमारत कोसळली. या ...

ठळक मुद्दे मुंबईतील जेजे मार्ग परिसरात गुरूवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हुसैनीवाला ही पाच मजली इमारत कोसळली. दुर्घटनेत 35 ते 40 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तविली जाते आहे.पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सकाळी दुर्घटना स्थळाची पाहणी केली.

मुंबई, दि. 31- मुंबईतील जेजे मार्ग परिसरात गुरूवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हुसैनीवाला ही पाच मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत 35 ते 40 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तविली जाते आहे. फायर ब्रिगेड आणि एनडीआरएफच्या टीमकडून युद्धपातळीवर बचावकार्य सध्या सुरू आहे. दरम्यान, पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सकाळी दुर्घटना स्थळाची पाहणी केली. हुसैनीवाला ही इमारत धोकादायक होती. या प्रकरणाच्या चौकशीचे तात्काळ आदेश दिले जातील तर प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, असं सुभाष देसाई यांनी म्हंटलं आहे. दक्षिण मुंबईत बहुसंख्य इमारती धोकादायक आहेत, त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता तातडीने सोडविला जाईल, असंही सुभाष देसाई म्हणाले आहेत.  दुर्घटना झालेली इमारत ही धोकादायक असल्याने काही लोकांनी आधीच घरं रिकामी केली होती. पण काही कुटुंब इमारतीत राहत होते. तेच लोक अपघातात सापडल्याचा दावा सुभाष देसाई यांनी केला आहे.

भेंडीबाजार पाकमोडिया स्ट्रीट भागात असलेल्या हुसैनीवाला या इमारतीला 2013 मध्ये इमारत धोकादायक असल्याची नोटीस बजावण्यात आली होती. तरीही काही कुटुंब इमारतीत राहत होती, अशी माहिती समोर येते आहे. दुर्घटना ठिकाणी अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तसंच स्थानिक लोकांकडूनही बचावकार्य केलं जातं आहे. एनडीआरएफचे ४५ जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. इमारतीचे एकुण तीन भाग असून त्यातील दोन इमारती कोसळल्या आहेत तर तिसरी इमारत ही आर्धी कोसळली असून इमारतीचा आर्धा भाग तसाच उभा असल्याची माहिती मिळते आहे.इमारतीच्या शेजारी असलेल्या बैठ्या चाळीवर या इमारती कोसळल्या आहेत. ढिगाऱ्याखाली ३5 ते 40 जण अडकले असावे असं सांगितलं जातं आहे. या दुर्घटनेचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. इमारतीमध्ये एकूण नऊ कुटुंबं राहत होती. दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शेजारच्या दोन इमारतीमधील कुटुंबांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.  ही इमारत 100 ते 125 वर्ष जुनी असल्याचीही माहिती समोर आली आहे. या इमारतीत एकुण 9 कुटुंबं रहात असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. इमारत कोसळल्यानंतर एक-दोन जण स्वतःहून बाहेर आले. हुसेैनीवाला इमारतीमध्ये एकूण 12 खोल्या आणि 6 गोडाऊन होते. या गोडाऊनमध्येही लोकं राहत असल्याचं समजतं आहे.

गेल्या महिभरात मुंबई आणि उपनगरात इमारत कोसळल्याची तिसरी घटना आहे. यापूर्वी २५ जुलै रोजी घाटकोपरमध्ये साई दर्शन इमारत कोसळली होती. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता. तर दोन दिवसांपूर्वी विक्रोळीत इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता.

घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघात