शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

सौभाग्याच्या रक्षणासाठी पत्नीने दिली पतीला किडनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 17:28 IST

करमाळा शहरातील घटना; किडनीदान करून पतीला मिळवून दिले जीवदान

ठळक मुद्देकरमाळा शहरातील दत्त पेठेत राहणारे अजित विनायक मसलेकर यांचा स्वाती हिच्याबरोबर १९९४ मध्ये विवाह झालापत्नीबरोबर सुखासमाधानात संसार करीत असताना २०१० मध्ये अजित मोटरसायकलवरून शेतातून घरी येत असताना त्यांचा अपघात झाला

करमाळा : अपघातात पतीराजांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या... पत्नीला काय करावं काही नाही सुचेना... कुटुंबाचा आधारवड जिवंत ठेवण्याबरोबर स्वत:च्या सौभाग्याचं रक्षण व्हावं म्हणून तिनं कसलीच पर्वा न करता किडनी दान करून पतीला जीवदान मिळवून दिलं. 

करमाळा शहरातील दत्त पेठेत राहणारे अजित विनायक मसलेकर यांचा स्वाती हिच्याबरोबर १९९४ मध्ये विवाह झाला. अजित हे जैन ठिंबक सिंचन, किर्लोस्कर इंजिन व मोटर्सचे अधिकृत विक्रेते आहेत. पत्नीबरोबर सुखासमाधानात संसार करीत असताना २०१० मध्ये अजित मोटरसायकलवरून शेतातून घरी येत असताना त्यांचा अपघात झाला. त्या अपघातात त्यांच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या. 

मसलेकर कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले. डॉ. संजय कोग्रेकर यांनी प्राथमिक उपचार करून कुटुंबीयांना धीर देत पुणे येथील जहाँगीर हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचा सल्ला दिला .

अजित मसलेकर यांना जीवदान देण्यासाठी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे अवश्यक होते. अजयचे भाऊ विजय यांनी आपली किडनी देण्याची तयारी दर्शविली होती; पण स्वाती मसलेकर यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न क रता क्षणाचा विलंब न लावता                  आपल्या पतीला जीवदान मिळावे, यासाठी २५ जून २०१० रोजी तिने किडनीदान केले. 

केवळ पत्नीमुळेच मी जिवंत- अजय मसलेकरअपघातात दोन्ही किडन्या फेल झाल्याने मी हताश झालो होतो, पण पत्नी स्वातीने धीर देत तिच्या जीवाची पर्वा न करता स्वत:ची एक किडनी मला दान केली व माझा पुनर्जन्म झाला. आम्ही दोघे आनंदात संसार करीत आहोत. सर्वात श्रेष्ठदान अवयव दान असेच मला म्हणायचे आहे, असे अजय मसलेकर यांनी सांगितले. आज मी आनंदी जीवन जगत आहे, त्याला केवळ आणि केवळ म्हणजे माझी पत्नी स्वाती. 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यOrgan donationअवयव दानMedicalवैद्यकीयWomenमहिला