शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

डीजे तालावर नाचत बसला नवरा, तिने निवडला 'दुसरा'; इतका उशीर होईल वाटले नव्हते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 09:14 IST

मलकापूर पांग्रा येथील हा विवाह साेहळा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या मित्रांच्या नादात एका नवरदेवावर नवरीच गमावण्याची वेळ आली.

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : ती मंडपात त्याच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेली. ‘...देर ना हो जाए, कहीं देर ना हो जाए...’ गाणे तिच्या मनात सुरू. पण तो काही यायचे नाव घेईना. कारण तो ‘आवाज वाढव डीजे तुझ्या...’च्या तालावर मित्रांसोबत मनसोक्त थिरकत होता. अखेर मुलीच्या नातेवाईकांनी लग्नच मोडले. इतकेच नव्हे, तर नवरीने चक्क नातेवाईकांनी सुचवलेल्या मंडपातीलच दुसऱ्या मुलाच्या गळ्यात माळही घातली. आता बोला... 

मलकापूर पांग्रा येथील हा विवाह साेहळा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या मित्रांच्या नादात एका नवरदेवावर नवरीच गमावण्याची वेळ आली. वरात लग्न मंडपात उशिरा पाेहोचल्याने संतप्त झालेल्या वधूकडील मंडळींनी लग्न माेडले. एवढेच नव्हे तर दुसऱ्याच मुलाबराेबर या मुलीचा विवाहही आटाेपला. मलकापूर पांग्रा येथील मुलीचा विवाह कंडारी येथील युवकाबराेबर २२ एप्रिलला ठरला हाेता. दुपारी ३.३० वाजता लग्नाची वेळ होती. त्यापूर्वी वराकडील मंडळी लग्नमंडपात पाेहोचणे अपेक्षित हाेते. मात्र झाले उलटे. पाहुणे उशिरा आले. त्यामुळे लग्नापूर्वी केल्या जाणाऱ्या धार्मिक विधींना अपेक्षेप्रमाणे उशीर झाला.  लग्नाच्या वेळेत विधी झाल्याने परण्या निघण्यासदेखील उशीर झाला. इथपर्यंत सर्व काही ठीक होते. मात्र, नवरदेवाची वरात निघाली आणि डीजे, बँडच्या तालावर थिरकणारे नवरदेवाचे मित्र मैदानात उतरले. मद्यधुंद अवस्थेत थिरकण्याच्या नादात दुपारचे लग्न तब्बल चार ते पाच तास उशिराने लागण्याची परिस्थिती निर्माण झाली. 

इतर कामांकडे लक्ष दिल्याचा तोटालग्न ठरविताना लग्न मुहूर्त काढला जातो, मात्र सध्याच्या परिस्थितीत मुहूर्तावर कुठेच लग्न लागत नाही. नवरदेवाच्या मित्रमंडळींना थिरकायचे असते तर वधूकडील मंडळींना लग्नापेक्षा सत्कार समारंभात अधिक रस असतो. याचा परिणाम लग्न मुहूर्तावर होऊ लागला आहे. याचा विचार दाेन्हीकडील मंडळींनी करण्याची गरज आहे.

लग्न न लावताच परतला नवरदेव वरात लग्न मंडपात येताच वधूच्या नातेवाइकांनी उशीर का केला, असा प्रश्न विचारला. नंतर दोन्ही बाजूंनी वादविवाद, झटापट झाली. नवरीकडील मंडळींनी जवळच्या पाहुण्यांशी सल्लामसलत करून नवरदेवाला लग्न न लावताच माघारी जाण्याचे फर्मान काढले! अखेर नवरदेवाला लग्न मंडपातून लग्नाशिवाय काढता पाय घ्यावा लागला. 

टॅग्स :marriageलग्न