शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

विषारी औषध घेऊन पती-पत्नीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 13:35 IST

सांगोला तालुक्यातील अजनाळे गावातील घटना

सांगोला : अज्ञात कारणावरून पती- पत्नी दोघांनीही विषारी औषध प्राशन केल्याने उलट्यांचा त्रास सुरू झाला म्हणून पुतण्याने उपचारासाठी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच पत्नीचा व उपचारासाठी सोलापूरला घेऊन जाताना पतीचा वाटेतच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री अजनाळे (ता सांगोला) येथे घडली आहे. संदिपान मारुती खांडेकर (वय 55) व आंबुताई संदिपान खांडेकर (वय 50) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.

 सहा महिन्यांपूर्वी पत्नी आंबुताई हिने अशाच प्रकारे चहात विष घालून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो फसल्याने पुन्हा शनिवारी मध्यरात्री जेवणात विष कालवून पत्नीने पतीसह आपली जीवनयात्रा संपविली.

अजनाळे येथील संदिपान मारुती खांडेकर हे पत्नी आंबुताईसह येथील खांडेकर येड्रावकर वस्ती येथे राहतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून दोघेही विवाहित आहेत. घरची शेतजमीन नसल्याने मुलगा मुंबई येथे पिठाची गिरणी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. दरम्यान आंबुताई हिने रात्री नऊच्या सुमारास जेवण बनविताना भाजीत विषारी औषध कालवून पती संदिपान खांडेकर यांच्यासह स्वतः जेवण केले मध्यरात्रीच्या सुमारास दोघांनाही उलट्यांचा त्रास सुरू झाला म्हणून सुट्टी निमित्त आजी-आजोबांकडे आलेली  नात गुड्डी विष्णू माने हिने शेजारील चुलत मामा सुदाम विठ्ठल खांडेकर यांना हा प्रकार सांगितला. सुदाम खांडेकर यांनी तात्काळ खाजगी वाहनातून पती-पत्नींना उपचाराकरिता सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले असता उपचारापूर्वीच आंबुताई हिचा मृत्यू झाला तर पती संदिपान खांडेकर यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना सोलापूरला घेऊन जाण्यास सांगितले, मात्र उपचारापूर्वीच संदिपान खांडेकर यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

पत्नी आंबुताई हिचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले असून संदिपान यांचे सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून दोघांचेही मृतदेह अजनाळे गावी नेण्यात आले रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ पूजा साळे यांनी पोलिसात खबर दिली आहे.

------------------------

म्हणून नातीचे वाचले प्राण

अंबुताईने आमटीत विषारी औषध कालविल्याने जेवणापूर्वी नात गुड्डीला दमदाटी व मारहाण करून जेवण करण्यापासून रोखले होते, म्हणून रागाने आजीवर रुसून गुड्डी उपाशीपोटीच झोपली होती. विषारी औषध असलेली आमटी खाण्यापासून रोखल्याने नात गुड्डी हिचे प्राण वाचले.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस