शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

हाँगकाँग टूरच्या नावाखाली शेकडो डॉक्टरांना फसवणाऱ्यास अटक

By admin | Updated: May 25, 2017 00:37 IST

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि मालाड मेडिकल असोसिएशन (एमएमए)चे सदस्य असलेल्या आणि

मुंबई : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि मालाड मेडिकल असोसिएशन (एमएमए)चे सदस्य असलेल्या आणि वैद्यकीय बैठकीसाठी हाँगकाँगला निघालेल्या शेकडो डॉक्टरांची एका टूर आॅपरेटरने फसवणूक केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. या टूरचे आयोजन करणारा आणि फरार असलेला ओपेक्स ट्रॅव्हल्सचा मालक विनायक झारेकर याच्या मुसक्या आवळण्यात बुधवारी दहिसर पोलिसांना यश आले.मालाड मेडिकल असोसिएशनच्या २५ डॉक्टरांची झारेकर याने फसवणूक केल्यामुळे ही टीम मकाऊमध्ये अडकली आणि त्या ठिकाणीही हॉटेल्सकडून वाईट वागणूक मिळाली. अखेर भारतात परतण्यासाठी त्यांना नातेवाइकांकडून पैसे मागवावे लागले. डॉक्टरांची ही संपूर्ण टीम बुधवारी भारतात परतली. मात्र आयएमएच्या ३९ डॉक्टरांचे पथक अशाच प्रकारे चीनच्या शॉन्झेनमध्ये शनिवारपासून अडकून पडले आहे. या डॉक्टरांच्या मदतीसाठी आयएमएने आर्थिक मदत पाठवली आहे. तिकीट रद्द करणे किंवा मग स्वत:च्या खर्चावर पुढील प्रवास करणे हे दोनच मार्ग या डॉक्टरांकडे शिल्लक आहेत. तथापि, ग्रुप बुकिंग असल्याने झारेकरलाच ती रद्द करण्याचा अधिकार होता. तो मात्र फरार झाला होता. त्यामुळे आता डॉक्टरांना परत बोलविण्यासाठी आयएमएला आर्थिक मदत पाठवावी लागली. या प्रकरणी एमएमएपाठोपाठ आयएमएनेदेखील दहिसर पोलीस ठाण्यात झारेकरविरुद्ध तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर त्याला अटक करून बोरीवली न्यायालयासमोर हजर करण्यात आले. झारेकरला २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती दहिसर पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.