शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

धान्यांच्या शेकडो पोत्यांचा काळाबाजार

By admin | Updated: June 8, 2016 20:11 IST

मोरगाव भागातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये दुकानदार स्वत:चे उखळ पांढरे करून घेत आहेत. दुकानांना धान्य कोटा मिळाल्यानंतर महिनाभर धान्य देण्याची सक्ती असूनही ह्यवाटप मुदत संपली

स्वस्त धान्य दुकान : दुाकानदारांचे उखळ पांढरेपुणे : मोरगाव भागातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये दुकानदार स्वत:चे उखळ पांढरे करून घेत आहेत. दुकानांना धान्य कोटा मिळाल्यानंतर महिनाभर धान्य देण्याची सक्ती असूनही ह्यवाटप मुदत संपली या नावाखाली शेकडो पोत्यांचा काळाबाजार येथे होत आहे.स्वस्त धान्य दुकानांमधून राष्ट्रीय अन्न व सुरक्षा कायद्यानुसार अल्प दरात, भूमिहीन, दारिद्य्ररेषेखालील बीपीएल धारकांना गहू, तांदूळ, रॉकेल, साखर दिले जाते. मात्र, ज्या उद्देशासाठी नवीन अन्नसुरक्षा कायदा झाला, तो उद्देश बाजूला राहून स्वस्त धान्य दुकाने मलिदा खाण्याची ठिकाणे झाली आहेत. मोरगाव येथे अधिकृत रेशन कार्डधारकांना रेशनिंग मिळत नाही. बोगस कार्डधारकांना रेशन मिळत असल्याची तक्रार आहे. कोटा आल्यानंतर पोत्यात माल कमी भरला असल्याचे व वरिष्ठांनाही पैसा पुरवावा लागतो, हे कारण देऊन रेशन कमी देऊन शिल्लक माल काळ्याबाजाराने परिसरातील दुकानदारांना विकण्यात येत आहे. महिन्याकाठी हजारोंची माया दुकानदार अशा रीतीने कमवत आहेत. काळ्याबाजारात जाणारा रेशनचा माल मोरगाव येथे सापळा रचून पकडल्याच्या अनेक घटना आहेत. मात्र, तालुक्यातील यामध्ये सापडलेल्या व्यक्तींना लगेच जामीन मिळतो. सर्वसामान्यांच्या पोटचा घास हिरावणाऱ्या या मुजोरांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे, अशी मागणीही रेशनकार्ड धारकांनी केली आहे. दक्षता समित्या नामधारी काळाबाजार रेशनिंगमध्ये परिसरातील गावकामगार तलाठ्यांचा सहभाग असल्याने गावोगावच्या दक्षता कमिट्या नामधारी आहेत. यामुळे तहसीलदारांनी लक्ष घालावे, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.