शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘हुक्का पार्लर’ला ‘कोप्टा’ लागणार, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:33 IST

राज्यात हुक्का पार्लरमध्ये होत असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला चाप लावण्यासाठी, हुक्का पार्लरचा समावेश केंद्र सरकारच्या सिगरेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायद्यात (कोप्टा अ‍ॅक्ट) करण्याची शिफारस केंद्राकडे करण्यात येणार असल्याची यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.

मुंबई : राज्यात हुक्का पार्लरमध्ये होत असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला चाप लावण्यासाठी, हुक्का पार्लरचा समावेश केंद्र सरकारच्या सिगरेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायद्यात (कोप्टा अ‍ॅक्ट) करण्याची शिफारस केंद्राकडे करण्यात येणार असल्याची यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.राष्ट्रवादीचे सदस्य प्रकाश गजभिये यांनी मद्यपान, धूम्रपान, तंबाखूच्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या संदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत राज्य सरकारकडून आरोग्यमंत्री दीपक सावंत, अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट आणि गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आपापल्या खात्याशी संबंधित प्रश्नांवर उत्तरे दिली. अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेला नियंत्रणात आणताना उच्च्भ्रू समाजात बोकाळलेल्या ई सिगारेटवर बंदी घालण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी केले. ई सिगारेट हे हल्ली आलेले उच्चभ्रू समाजातील व्यसन आहे. यात सिगारेटला धूर येत नाही. यात द्रव रूपातील शुद्ध निकोटीन वापरले जाते. त्यामुळे नेहमीच्या सिगारेटच्या तुलनेत जास्त हानिकारक आहे, असेही त्यांनी सांगितले. शिवाय, तंबाखू खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना जरब बसेल, या दृष्टीने कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.गुटख्यावरील बंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचे काम चालू आहे. यातील दोषी व्यक्तीला तीन वर्षांपासून जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंतची तरतूद यात असेल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र