शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत आणि 'ओरिओ'च्या मोदक उपक्रमाला उदंड प्रतिसाद, 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये झाली नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 12:45 IST

गणेशोत्सवाच्या निमित्ताने ओरिओ आणि लोकमतने एक खास उपक्रम राबवला होता ज्याचे नाव होते 'मोदक बनवा घरी, ह्यातच गंमत खरी'.

महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...अशा घोषणांनी बाप्पाला निरोप देण्यात आला. गणेशोत्सव म्हटलं की मोदक आलेच. नेहमीप्रमाणे यंदाही अनेकांनी मोदकांवर ताव मारला असेल. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने ओरिओ आणि लोकमतने एक खास उपक्रम राबवला होता ज्याचे नाव होते 'मोदक बनवा घरी, ह्यातच गंमत खरी'. या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. एवढेच नाही तर या उपक्रमाची 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे.

लोकमत आणि कॅडबरी ओरिओच्या 'मोदक बनवा घरी, ह्यातच गंमत खरी' या उपक्रमाअंतर्गत स्पर्धकांना एक दिवस ठरवून देण्यात आला होता आणि त्या दिवशी स्वतःच्या घरी कोणत्याही प्रकारचे मोदक बनवायचे होते. या मोदकांचे फोटो दिलेल्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक आणि दिलेल्या संकेतस्थळावर अपलोड करायचे होते. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना कुटुंबासोबत 'लालबागच्या राजा'ला भेटण्याची संधी मिळणार होती.

या स्पर्धेत तीन हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला आणि एका दिवसात विविध प्रकारचे मोदक बनवून फोटो अपलोड करत नवा विक्रम रचला. या स्पर्धेची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. तसेच स्पर्धकांना लालबागच्या राजाचे दर्शन घडवले.

एवढेच नाही तर महाराष्ट्रातील अनेक गणेशोत्सव मंडळांमध्ये लोकमत आणि कॅडबरी ओरिओतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विजेत्यांना बक्षिसेही देण्यात आली. यात ओरिओ बिस्कीटचे पीठ बनवून लोकांना मोदकही बनवण्याचेही टास्क देण्यात आले होते. मंडळातील या उपक्रमांनाही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.