शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा निकाल लांबणीवर ? शिक्षकांचा बहिष्कार : ६५ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 03:27 IST

शासनाने मान्य केलेल्या मागण्यांचे आदेश न काढल्याने गेल्या सहा दिवसांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलेला आहे.

मुंबई : शासनाने मान्य केलेल्या मागण्यांचे आदेश न काढल्याने गेल्या सहा दिवसांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलेला आहे. परिणामी, राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या विविध विषयांच्या तब्बल ६५ लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून असून त्यामुळे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता विविध शिक्षक संघटनांकडून व्यक्त होत आहे.शासनादेश निघत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने घेतला आहे. महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी सांगितले की, आजघडीला शिक्षकांनी एकही उत्तरपत्रिका तपासलेली नाही. आंदोलन लांबल्यास त्याचा परिणाम बारावीच्या निकालावर होण्याची भीती देशमुख यांनी व्यक्त केली आहे. राज्यात बारावीचे १५ लाख विद्यार्थी आहेत. आणखी दोन दिवस आंदोलन सुरू राहिल्यास ५ जूनपूर्वी बारावीचा निकाल लागणे कठीण होणार आहे.निकाल वेळेतच लागणार!मंडळाने शिक्षकांना सहकार्याचे आवाहन केलेले आहे. यासंदर्भातील बैठक मंत्रालयात मंगळवारी, २७ फेब्रुवारी रोजी होईल. त्यात शिक्षकांच्या मागण्यांवर निश्चित तोडगा काढला जाईल. त्यामुळे बारावीच्या निकालावर कोणताही परिणाम होणार नाही.- डॉ. शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळलेखी आश्वासनावर विश्वास नाही!१५ दिवसांत शासन आदेश काढण्याचे सरकारने दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. त्यामुळे आता शासन आदेश निघत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. निकालास दिरंगाई झाल्यास शासन जबाबदार असेल.- प्रा. अनिल देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ

टॅग्स :Teacherशिक्षकexamपरीक्षा