शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
2
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
3
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
4
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
5
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
6
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
7
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
8
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
9
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
10
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
11
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
12
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
13
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
14
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
15
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
16
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
17
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
18
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!

पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 07:39 IST

२३ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत, १३ जूनपासून कॉलेज सुरू होणार 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षीय पदवीसाठी ८ मेपासून मुंबई विद्यापीठाकडून नावनोंदणी सुरू होणार आहे.   २३ मेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. तर पहिली गुणवत्ता यादी २७ मे रोजी जाहीर केली जाणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागामध्ये प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स/ऑनर्स विथ रिसर्च, ५ वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टिपल एंट्री अँड मल्टिपल एक्झिटनुसार प्रवेश प्रक्रिया होणार आहे. बिगरव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. संकेतस्थळावर प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करावी लागणार आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले. 

या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया विद्यापीठाने प्रथम वर्ष बीए, बीएस्सी, बीकॉम, बीए-एमएमसी, बीएसडब्ल्यू, बीए (फिल्म टेलिव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन),  बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीए-एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन पाली) बीएमएस-एमबीए (एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम (अकाउंटिंग अँड फायनान्स), बीकॉम (बँकिंग अँड इन्शुरन्स), बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम (इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज), बीएस्सी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी (बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी (मेरिटाइम), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी (एरॉनॉटिक्स), बीएससी (डेटा सायन्स), बीएस्सी (एव्हिएशन), बीएस्सी (ह्यूमन सायन्स), बी.व्होक. (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनालिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, एफ. वाय. बी व्हॉक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफवाय बी. लायब्ररी सायन्स, बी. म्युझिक, बीपीए (म्युझिक), बीपीए (डान्स) एफवाय बीएस्सी (बायोएनालिटिकल सायन्स-एकात्मिक अभ्यासक्रम) यासह विविध अनुदानित, विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. 

ऑनलाइन नोंदणीचे वेळापत्रकअर्जविक्री (संबंधित महाविद्यालयाद्वारे ऑनलाइन/ऑफलाइन) – ८ मे ते २३ मे प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया (विद्यापीठ संकेतस्थळावर) – ८ मे ते २३ मे

पहिली मेरिट लिस्ट – २७ मेऑनलाइन कागदपत्रे पडताळणी, शुल्क भरणा – २८ मे ते ३० मेदुसरी मेरिट लिस्ट - ३१ मे ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी, शुल्क भरणा - २ जून ते ४ जूनतिसरी लिस्ट - ५ जूनऑनलाइन कागदपत्रे पडताळणी, शुल्क भरणा - ६ जून ते १० जूनवर्ग सुरू होणार - १३ जून

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल