शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस कशी दिली? उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 08:39 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीत हनुमानाचे मंदिर पाडले जाण्याची नोटीस येते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दादर विभागात ८० वर्षांपासून असलेले हनुमान मंदिर पाडण्याची नोटीस सरकारने पाठविली आहे. रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केले आहे, असे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे. सरकार हमालांनी बांधलेले ८० वर्षांपूर्वीचे मंदिर पाडायला निघाले आहेत. हे कुठले हिंदुत्व आहे? हिंदूंना भयभीत करून त्यांची मते घ्यायची. इतकेच त्यांचे हिंदुत्व शिल्लक उरले आहे का? असा सवाल उद्धवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेतून केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीत हनुमानाचे मंदिर पाडले जाण्याची नोटीस येते. अशा वेळी फडणवीस यांचे हिंदुत्व काय करत आहे? रामाचे मंदिर उभारले; पण त्याच रामभक्त हनुमानचे मंदिर कसे तोडता? ‘एक है तो सेफ है’, म्हणता; पण बांगलादेशातील, मुंबईतील मंदिरे सेफ नाहीत. वन नेशन, वन इलेक्शन सगळे नंतर पाहता येईल; पण आता मंदिरे सुरक्षित नाहीत. हिंदुत्व सोडले असे आम्हाला विचारता, मग तुम्ही हे काय सोडले आहे, अशी टीका ठाकरे यांनी यावेळी केली. बांगलादेशात मंदिरे जाळली जात आहेत. तिथे हिंदूंवर अत्याचार होत आहेत. जे हिंदुत्व, हिंदुत्व करतात त्यांची हिंदुत्वाची व्याख्या काय आहे? भाजपकडे फक्त निवडणुकीपुरते हिंदुत्व उरले आहे का, असा सवाल ठाकरे यांनी केला.

रेल्वेकडून हनुमान मंदिराला नोटीस बजावल्याची माहिती मिळताच प्रत्येक भक्ताच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आम्ही कोणत्याही परिस्थितीत मंदिर पाडू देणार नाही. यासाठी लढण्यास पूर्णपणे तयार आहोत    - प्रकाश कारखानीस,     विश्वस्त, हनुमान मंदिर 

हिंदुत्वाविषयी ठाकरेंचे बेगडी प्रेमउद्धव ठाकरे यांनी हिंदूंविषयी आपल्या भावना व्यक्त करू नयेत, त्यांचे हिंदू आणि हिंदुत्वाविषयीचे प्रेम बेगडी आहे, असे प्रत्युत्तर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. ज्यावेळी साधू हत्याकांड झाले त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यावेळी त्यांची काय भूमिका होती ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले, असेही ते म्हणाले. 

आधी पाच वेळा नोटीस दादर येथील हनुमान मंदिराला याआधी पाचवेळा नोटीस पाठविली त्यावेळी आमचे सरकार नव्हते. आता नोटीस पाठविली म्हणजे मंदिर तोडले असे होत नाही. केंद्र व राज्य सरकार यात लक्ष घालेल आणि निश्चितच मंदिराचे रक्षण करणे किंवा त्यांची पुनर्स्थापना योग्य पद्धतीने करणे, ही आमची जबाबदारी असून, जराही मागे हटणार नाही, असेही दरेकर म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस