शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सहानी खटल्याचा मराठा आरक्षणात अडथळाच नाही...; महाधिवक्त्यांनी बैठकीत ठेवले 'या' मुद्द्यांवर बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 13:53 IST

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तात्काळ तोडगा काढावा. सरकार आंदोलन हाताळण्यात कमी पडले, असे अशोक चव्हाण म्हणाले.

मराठा आरक्षणावरील पेचावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये काही गोष्टींवर एकमत झाले आहे. तसेच या बैठकीत हिंसाचारावर तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांवर राज्याचे महाधिवक्ता अॅड. बीरेंद्र सराफ आपले मत मांडले. 

सहानी खटल्याचा आरक्षण देण्यासाठी अडथळा नसल्याचे सराफ यांनी सुरुवातीला स्पष्ट केले. परंतू, मराठा समाज हा मागास असल्याचे सिद्ध करणे गरजेचे आहे. तसेच एका दिवसाच्या अधिवेशनामुळे मराठा आरक्षणाचा तिढा देखील सुटणार नसल्याचे त्यांनी या बैठकीत मांडले. 

यानंतर या बैठकीत मराठा समाजाला मागास कसे ठरविणार, त्यातून आरक्षणाचा मार्ग कसा काढणार यावर चर्चा झाली. महाधिवक्त्यांच्या म्हणण्यावर सर्वपक्षांचे एकमत झाले. यानंतर शिंदे यांनी विरोधकांना सकारात्मक राहण्याचे आवाहन केले. विरोधी पक्षाची भूमिका महत्वाची आहे, त्यांनीही सरकारला मदत करणे अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयातील क्युरिटीव्ह पिटीशनवर लवकरच सुनावणी होईल, असे शिंदे म्हणाले. 

आरक्षणाबाबत कायद्याची बाजू सर्व पक्षीयांनी समजून घेतली पाहिजे. कायद्याच्या पातळीवर टिकेल अशा गोष्टी सरकार करेल. राजकारण कोणालाही करायचं नाही. आपण सगळे याबाबत सहकार्य करतच आहात. पण यापुढे आपल्यातील काही नेत्यांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारची बाजूही समजून घ्यावी, असे फडणवीस म्हणाले. मराठा आरक्षणाच्या विषयात केंद्राने हस्तक्षेप करावा. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तात्काळ तोडगा काढावा. सरकार आंदोलन हाताळण्यात कमी पडले, असे अशोक चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे