शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

सिंचन नेमके किती, आकडेवारी मिळेना!

By admin | Updated: March 18, 2017 00:47 IST

७० हजार कोटी खर्च करुनही सिंचन झाले नाही, मग हा पैसा गेला कुठे? असा सवाल आघाडी सरकारला विरोधकांकडून विचारला जात होता. आता भाजपा शिवसेनचे सरकार आले

- अतुल कुलकर्णी,  मुंबई७० हजार कोटी खर्च करुनही सिंचन झाले नाही, मग हा पैसा गेला कुठे? असा सवाल आघाडी सरकारला विरोधकांकडून विचारला जात होता. आता भाजपा शिवसेनचे सरकार आले तरी राज्यात नेमके किती क्षेत्र सिंचनाखाली आहे याची कोणतीही आकडेवारी उपलब्ध करुन देता आलेली नाही. २०१४-१५ साली एकूण सिंचित क्षेत्र किती याचे उत्तर ‘उपलब्ध नाही’ असे आर्थिक पहाणी अहवालात देण्यात आले७० हजार कोटी खर्च करुन अवघे दोन टक्के सिंचन झाले असा आक्षेप घेण्यात आल्याने राष्ट्रवादीवर राजकीय कुरघोडी करण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचन विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली. दोन्ही काँग्रेसच्या या दुहीचा फायदा घेत भाजपाने राज्यभर आघाडीविरुध्द जोरदार प्रचार मोहीम राबवली. सत्तेवर आल्यानंतर सिंचन विभागाला गती देणार, सिंचनाला पैसे कमी पडू देणार नाही, सिंचनाच्या कामात पारदर्शकता आणणार, अशा घोषणा युती सरकारने केल्या खऱ्या पण प्रत्यक्षात युती सरकारला देखील किती क्षेत्र सिंचनाखाली आणले गेले याची आकडेवारी देता आलेली नाही. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिंचनासाठी जेवढी तरतूद केली गेली त्यात एक रुपयाही कमी न करता सगळाच्या सगळा निधी वितरीत केला होता. तरीही आकडेवारी गोळा करण्यात भाजपा सरकारला अपयश आले आहे. सिंचीत क्षेत्रात विहीरी, इतर साधने, निव्वय क्षेत्र व एकूण क्षेत्र किती तसेच ओलिताखालील पिकांची सघनता, सिंचन विहीरींची संख्या, दर विहीरीमागे सिंचित निव्वळ क्षेत्र आणि स्थूल सिंचित क्षेत्राची पिकांखालील स्थूल क्षेत्राशी टक्केवारी या सगळ्यांचे उत्तर ‘‘उपलब्ध नाही’’ असे देण्यात आले आहे.आर्थिक पहाणी अहवाल हा राज्याच्या आर्थिक कारभाराचा आरसा असतो. त्या अनुषंगाने पाहिल्यास अनेक विभागांची धक्कादायक माहिती यात आली आहे. २०१५-१६ मध्ये महाराष्ट्रातून होणारी निर्यात ४,३६,४३५ कोटींची होती ती २०१६-१७ मध्ये मोठ्या प्रमाणावर कमी होऊन २,९५,९७६ कोटींवर आली आहे. त्याशिवाय २०१४-१५ वर्षाच्या तुलनेत २०१५-१६ मध्ये तांदूळ, बाजरी, तूर, उडीद, भूईमूग, सोयाबीन, करडई आणि ऊस या सगळ्या पिकांचे उत्पादन कमी झाल्याचे हा अहवाल सांगतो.खासगी सावकार वाढलेखासगी सावकारांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय भाजपा सरकारने घेतला होता. मात्र २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये राज्यात परवानाधारक खासगी सावकारांची संख्या वाढल्याची धक्कादायक माहिती यातून पुढे आली आहे. सरकारने नवीन खासगी सावकारी करण्यासाठी परवाने वाढवून दिले त्यामुळे खासगी सावकाराकडे जाऊन कर्ज घेणाऱ्यांची संख्याही मोठ्याप्रमाणात वाढली. खालील आकडेवारीतपशील२०१५२०१६परवाना धारक १२,०२२१२,२०८नवीन परवाने१,५८९१,९४७रद्द केलेले४७७७१९कर्ज (कोटी)८९६.३४१२५४.९७कर्जदार ७,०४,४५२ १०,५६,२७३(आकडेवारी कोटीत)