शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

अजून किती जणांना पक्षातून हाकलणार; आम्ही शिवसेनेतच, मुख्यमत्र्यांनी ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 06:35 IST

भावना गवळींच्या हकालपट्टीबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी, राष्ट्रपती पदावर एक आदिवासी महिला विराजमान होत असेल तर ती अभिमानाची बाब आहे, असे शिंदे म्हणाले

ठाणे : लोकसभेच्या शिवसेनेच्या प्रतोदपदावरुन खासदार भावना गवळी यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर अजून किती जणांची पक्षातून हकालपट्टी करणार, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू  यांना समर्थन देण्याची घेतलेली भूमिका योग्य असल्याचेही शिंदे म्हणाले.

आम्ही यापूर्वी शिवसेनेत होतो, आजही शिवसेनेत असून, आम्ही शिवसैनिक असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. कायदा आणि नियमाने आम्हाला आमचे पद दिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात शिवसेना विरुध्द एकनाथ शिंदे यांच्यातील सामना अद्याप संपलेला नाही. लोकसभेतील शिवसेना संसदीय पक्षाच्या प्रतोद पदावरुन भावना गवळी यांची हकालपट्टी केल्याचा उल्लेख करुन शिंदे म्हणाले की, आणखी किती जणांची हकालपट्टी करणार आहात. खा. शेवाळे यांनी राष्ट्रपती पदासाठी भाजप उमेदवाराला समर्थन देण्यासाठी उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र योग्य आहे. 

राष्ट्रपती पदावर एक आदिवासी महिला विराजमान होत असेल तर ती अभिमानाची बाब आहे, असे शिंदे म्हणाले. मोदी यांनी हे मोठे पाऊल उचलले आहे. त्याला पाठिंबा देणे हे योग्य आहे, असेही ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाता जाता औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर केल्याचे जाहीर केले. त्यानंतर एमआयएमने या नावाला विरोध केला आहे, याकडे शिंदे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था कुणाही हातात घेऊ नये. मग ती व्यक्ती खासदार असो की आमदार. सरकार अशा व्यक्तीवर कारवाई करील. शांततेच्या मार्गाने हे प्रश्न सोडविता येऊ शकतात, असे ते म्हणाले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे