शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

""अजून किती बळी देणार? आता होवून जावू द्या"", शहीदाच्या वडिलांचे भावपूर्ण उद्गार

By admin | Updated: June 23, 2017 21:17 IST

जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानी बॉर्डर एक्शन टीमने केलेल्या भ्याड हल्ल्यात माझा मुलगा संदीप जाधव शहीद झाल्याची बातमी टीव्हीवर बघून मला धक्का बसला.

ऑनलाइन लोकमत

सिल्लोड(औरंगाबाद), दि. 23 - जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानी बॉर्डर एक्शन टीमने केलेल्या भ्याड हल्ल्यात माझा मुलगा संदीप जाधव शहीद झाल्याची बातमी टीव्हीवर बघून मला धक्का बसला. परिवाराला ही बातमी कळू नये म्हणून मी टीव्ही बंद केला. मुलगा शहीद झाल्याचे दुःख आहे व अभिमानही आहे. अजून किती सैनिकांचे बळी देणार? आता पाकिस्तानी दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी आता एकदा होवून जावू द्या, असे भावपूर्ण उद्गार शहीद संदीपचे वडील सर्जेराव जाधव यांनी हुंदका फोडत काढले.गुरूवारी कश्मीरच्या नियंत्रण रेषेवर झालेल्या भ्याड हल्ल्यात संदीप जाधव शहीद झाल्याची बातमी सर्व टीव्ही चॅनल्सवर सुरु होती. ही बातमी केळगाव वासियांसाहित सर्व राज्यातील जनतेने बघितली. परंतू संदीपच्या वडिलांशिवाय कुटुंबातील लोकांना रात्रभर ही माहिती कळुच दिली नाही. संदीप जाधवच्या वडिलांनी रात्री 9:30 ला टीव्ही सुरु केला आणि तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीने तिच्या वडीलाचे फ़ोटो बघितले आणि पप्पा म्हणून ओरडली, आजोबांनी लगेच टीव्ही बंद केला अन् छातीवर दगड ठेवून रात्रभर ही बातमी कुणालाच कळू दिली नाही.अर्थात कुटुंबातील लोकांना धक्का बसेल म्हणून ही बातमी लपवली असली तरी रात्रभर ते हे दुःख लपवून एकांतात रडत बसले होते. संपूर्ण केळगाव व परिसरातील लोक या घटनेमुळे स्तब्ध झाले होते. शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत संदीपच्या कुटुंबाला ही बातमी कळू नये यासाठी गावकऱ्यांनी नियोजन केले होते. मिडियाच्या लोकांनाही शुक्रवारी सकाळी 10 पर्यंत बाहेरच थांबवण्यात आले होते. सकाळी प्रशासनाचे अधिकारी ,पोलिस बघुन या घटणेचा उलगड़ा झाला. या घटनेमुळे केळगाव सहित सिल्लोड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.एक दिवसांपूर्वी झाले होते अखेरचे बोलणे-संदीप जाधव यांनी बुधवारी आपल्या वडिलांना फोन करून कुटुबांच्या व्यक्तींची खुशाली विचारली होती. बाबा मी चांगला आहे तुम्ही कसे आहात . माझ्या मुलाचा वाढदिवस आहे मी बोर्डर वर असल्याणे येवू शकत नाही. पण तुम्ही मुलाचा वाढदिवस साजरा करा मी लवकरच येतो. असे बोलुन् संदीप ने फोन कट केला. मुलाच्या वाढदिवशी बापावर अंत्यसंस्कार ...संदीप जाधवचा मुलगा शिवेंद्रचा आज शनिवारी पहिला वाढदिवस आहे. गुरुवारी संदीप ला वीर मरण आले. शुक्रवारी तांत्रिक अडचणी मुळे संदीप चे प्रेत केळगावला येवू शकले नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी 9 वाजता त्यांच्यावर सिल्लोड तालुक्यातील केलगाव येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे . आता वाढदिवस साजरा करावा की शहीद दिन साजरा करावा अशा द्वि धा मनस्थितित संदीपचा परिवार आहे.संदीप हा 2002 मध्ये सैन्यात भरती झाला होता. 15 वर्ष त्याची नोकरी झाली होती . अवघ्या दीड वर्षात तो सेवानिवृत्त होणार होता, पण नियतीला हे मान्य नव्हते . दहशतवाद्याच्या भ्याड हल्ल्यात संदीपला वीरमरण आले. संदीपचे मोठे भाऊ रविंद्र व वडील सर्जेराव हे शेती करतात. संदीपच्या पश्चात तीन वर्षाची मुलगी मोनिका व एक वर्षाचा मुलगा शिवेंद्र तसेच पत्नी उज्वला आई वडील असा परिवार आहे.शहीद सैनिकांसाठी विधानसभेत आवाज उठवणार....संदीप सर्जेराव जाधव हे दहशदवादी हल्ल्यात शहीद झाले संदीप जाधव यांची नेहमीच आठवण आमच्या मनात राहील.या हल्ल्याचा कितीही कठोर शब्दात निषेध व्यक्त केला तरीही कमी आहे. रमजानच्या महिन्यात ज्या राक्षसी वृत्तीच्या आतंकवाद्यांनी हा हल्ला केला त्यांना भगवान कधीही माफ़ करणार नाही.तसेच अशा हल्ल्यांचा जागतिक पातळीवर विचार होणे आवश्यक आहे जेणेकरुण कुठेतरी दहशदवादी हल्ले थांबतील. असे हल्ले किती दिवस सहन करायचे किती सैनिकांचे प्राण गमवायचे हा विषय राजकारणारचा किंवा कुठल्याही पक्षाचा नाही यामुळे देशाच्या राज्यकर्त्यांनी अता कठोर निर्णय घ्यावयाची आवश्यकता आहे.तसेच महाराष्ट्र शासनाने शहीद झालेल्या सैनिकांच्या परिवारासाठी विशेष निधि मंजूर करावा यासाठी येत्या विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठवणार आहे. तसेच जाधव यांनी जमीन उपलब्ध करुण दिल्यास तेथे शहीद संदीप जाधव यांचे स्मारक उभारणार.आ अब्दुल सत्तार केळगाव येथील सेवानिवृत्त सैनिक.......केळगाव या गावातील अतापर्यन्त पंचवीस जवान हे देशसेवेसेत कार्यरत असून याची सुरुवात सन् 1982 सालापासून सुरु झाली.गावातील विलास कौतिक सुल्ताने यांनी 1982 साली सैन्यात दाखल होऊन ही सुरुवात केली.त्यानंतर विश्वनाथ खंडू शिंदे 1987,निवृत्ति परसराम मुळे 1988, भिकुलाल भालचंद्र बड़ोदे 1986,मानिकराव उत्तम गरुड़ 1996, गोकुळ हरी इवरे 1995,चिंधाराम रामदास निंभोरे 1984 ,रामदास भिकन मख 1989 या सनिकांनी देशसेवेसाठी आयुष्य वेचुन सेवानिवृत्त झाले असले तरी मात्र गावातील युवकांना देशसेवेसाठी प्रव्रुत्त केले.व तब्बल पंचवीस युवक हे आज मिल्ट्री मध्ये देशसेवेसाठी आपले कर्तुत्व बजावत आहे.सैन्यात कार्यरत असलेले गावातील जवान.......योगेश पोतदार,ज्ञानेश्वर मुळे,सोमनाथ विट्ठल कोल्हे,गजानन विश्वनाथ माखोडे,लक्ष्मण सुखदेव मुळे,कैलास तुकाराम मख,बबलू संजय जाधव,विकास जगन पवार,जगदीश भीमराव कोठाळकर, राजू भगवान डाखोरकर,समाधान साळुबा पगारे,दत्तू विश्वनाथ आदमाने,अमोल विश्वनाथ शिंदे यांच्यासह अजुन दहा ते बारां जवान सैन्यात सेवा बजावत आहे.केळगाव येथील तीसरे जवान शहीद.....यापुर्वी केळगाव येथील माधव नारायण गावंडे 8 जुलै 2003, कळुबा भावराव बनकर 27 फेब्रुवारी 2010 साली देशसेवा बजावत असताना शहीद झाले होते. तर 22 जून गुरुवार 2017 रोजी दहशदवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात प्रत्युत्तर देताना संदीप जाधव यांना वीरमरण आले.