शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 16:14 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

Maharashtra CM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेन्स कायम आहे. नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे, पण राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? त्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही. निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री ठरवण्यासाठी महायुतीचे नेते सातत्याने बैठका घेत आहेत.

काल(दी.28) रात्रीदेखील गृहमंत्री अमित शाहांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही, असा दावा केला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या नावावर अजूनही सस्पेन्स कायम आहे, त्यामुळे आता निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर, किती दिवसांत शपथविधी होणे बंधनकारक आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसे झाले नाही तर, पुढे राज्यपाल काय कारवाई करतात? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया...

नवीन मुख्यमंत्र्यांची शपथ किती दिवसांत घेणे बंधनकारक आहे?सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता आशिष पांडे म्हणतात, निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर किती दिवसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणे बंधनकारक आहे, याबाबत भारतीय राज्यघटनेत कोणताही स्पष्ट नियम नाही. साधारणपणे कोणत्याही राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर 1 ते 7 दिवसांत मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली जाते किंवा शपथ घेण्याची प्रक्रियाही पूर्ण होते. 

कोणत्याही पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला नाही, तर अशा परिस्थितीत राज्यपाल सर्वाधिक उमेदवार जिंकणाऱ्या पक्षाला सरकार स्थापनेचा दावा करण्यास सांगतात. जर सर्वाधिक उमेदवार जिंकणारा राजकीय पक्ष राज्यात सरकार स्थापन करू शकत नसेल, तर राज्यपाल दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करू शकतात. पणष राज्यात सरकार स्थापनेला बराच विलंब होत असेल, तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्याचा अधिकार राज्यपालांना नक्कीच आहे. 

भारतीय राज्यघटनेच्या कलम 356 मध्ये असे म्हटले आहे की, जेव्हा राष्ट्रपती, राज्यपालांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर किंवा राज्याचे सरकार घटनेच्या तरतुदींनुसार चालवता येत नसेल, तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. सुरुवातीच्या टप्प्यात राष्ट्रपती राजवट 6 महिन्यांसाठी वैध असते, परंतु आवश्यक असल्यास ती 6 महिन्यांपासून जास्तीत जास्त 3 वर्षांपर्यंत वाढवता येते. महाराष्ट्राच्या बाबतीत अशी स्थिती दिसत नसून, येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांचे नाव समोर येईल, असा दावा केला जात आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री