शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
4
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
5
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
7
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
8
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
9
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
10
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
11
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
12
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
13
भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराला दिलासा; छाननीत बाद झालेले १२ अर्ज कोर्टात वैध
14
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
15
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
16
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
17
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
18
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
19
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
20
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात किती बालमृत्यू? तीन प्रधान सचिव दौऱ्यावर; राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 06:51 IST

मेळघाटमध्ये कुपोषणामुळे बालक, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होत असल्याने उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत

मुंबई - कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचा, स्तनदा माता आणि गर्भवती महिलांच्या समस्येचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग आणि आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव ५ डिसेंबर रोजी मेळघाटच्या दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.

मेळघाटमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मेळघाटात पाठविण्याबाबत सोमवारी उच्च न्यायालयाने सूचना केली होती. तसेच याप्रकरणी न्यायालयाने सरकारवर ताशेरेही ओढले होते. या तिन्ही विभागांच्या प्रधान सचिवांव्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभाग, वित्त विभाग आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिवही या दौऱ्यावर असणार आहेत. तसेच मेळघाटमधील सर्व संबंधित सरकारी अधिकारीही यावेळी मेळघाटची पाहणी करतील.

१८ डिसेंबरपर्यंत अहवाल देण्याचे निर्देशमेळघाटच्या स्थितीबाबत आणि सरकारच्या योजना प्रत्यक्षात तेथील बालक व महिलांपर्यंत पोहोचत आहे की नाही, याची पाहणी करून १८ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठाने सरकारला दिले. डॉक्टरांना १७ हजारांच्या आसपास वेतन मिळते. मात्र, एजन्सीद्वारे त्यांची नियुक्ती करण्यात आल्याने प्रत्यक्षात त्यांच्या हातात १२ हजार रुपये येत असल्याची बाब याचिकादार बंडू साने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली. एजन्सी आली की असे प्रकार घडतात. ते अत्यंत कमी वेतन कर्मचाऱ्यांना देतात आणि स्वत:ला जास्त रक्कम घेतात. याचा अनुभव आम्हाला आहे. त्यामुळे एजन्सीद्वारे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू नका, असा आमचा आग्रह आहे. ते केल्यास जास्त रक्कम कर्मचाऱ्यांना मिळेल, याची खात्री करा, असे न्यायालयाने म्हटले.

पुढील सुनावणी १९ डिसेंबरलामेळघाटमध्ये कुपोषणामुळे बालक, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होत असल्याने उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने या याचिकांवरील सुनावणी १९ डिसेंबर रोजी ठेवली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Melghat Child Mortality: Secretaries' Visit, High Court Informed, Government Action

Web Summary : To address Melghat's malnutrition crisis, three principal secretaries will visit. The High Court directed a report by December 18th. Concerns were raised about low wages paid to doctors through agencies, urging direct hiring to ensure better compensation. Next hearing is December 19th.
टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMelghatमेळघाट