शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

असे मिळवा प्रवेशासाठी दाखले, विद्यार्थी पालकांसाठी आवश्यक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 4:26 AM

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी विविध दाखले, प्रमाणपत्रांची गरज भासते. ती मिळविण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, प्रक्रिया आदींची माहिती ‘लोकमत’ने विद्यार्थी आणि पालकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

मुंबई  - अकरावीची प्रवेश प्रक्रिया राज्यभरात तशीच मुंबईतही सुरू झाली आहे. बारावीनंतरची विविध महाविद्यालये, तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी विविध दाखले, प्रमाणपत्रांची गरज भासते. ती मिळविण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, प्रक्रिया आदींची माहिती ‘लोकमत’ने विद्यार्थी आणि पालकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.जातीचा दाखला -ओबीसी, मराठा प्रवर्गआवश्यक कागदपत्रे :१) घराण्यातील ज्याचा सन १९६७ पूर्वी जन्म झाला आहे, त्या व्यक्तीचा जातीच्या पुराव्यासहित एक कागदपत्र पुरावा म्हणून द्यावे. (उदाहरणार्थ : शाळेचा दाखला, तहसील कार्यालयातील जन्म नोंदी) रक्तनात्यातील वंशावळ सिद्ध करणारे पुरावे.२) सन १९६७ पूर्वीचा रहिवासाबाबतचा महसूल पुरावा. (उदा. १९६७ पूर्वीचा सातबारा उतारा अथवा ग्रामपंचायतीकडून मिळणारे घरठाण पत्रक (असेसमेंट उतारा).३) रेशन कार्ड, आधार कार्ड आणि एक छायाचित्र.विशेष मागास प्रवर्ग, विमुक्तजाती आणि भटक्या जमाती(एसबीसी, व्हीजेएनटी)१) घराण्यातील ज्याचा सन १९६१ पूर्वी जन्म झाला आहे, त्या व्यक्तीचा जातीच्या पुराव्यासहित एक कागदपत्र पुरावा म्हणून द्यावे. (उदाहरणार्थ : शाळेचा दाखला, तहसील कार्यालयातील जन्म नोंदी) रक्तनात्यातील वंशावळ सिद्ध करणारे पुरावे.२) सन १९६१ पूर्वीचा रहिवासाबाबतचा महसूल पुरावा. (उदा. १९६१ पूर्वीचा सातबारा उतारा अथवा ग्रामपंचायतीकडून मिळणारे घरठाण पत्रक (असेसमेंट उतारा).३) रेशन कार्ड, आधार कार्ड आणि एक छायाचित्र.अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती(एस.सी., एस.टी.)१) घराण्यातील ज्याचा सन १९५० पूर्वी जन्म झाला आहे. त्या व्यक्तीच्या जातीच्या पुराव्यासहित एक कागदपत्र पुरावा म्हणून द्यावे. (उदाहरणार्थ : शाळेचा दाखला, तहसील कार्यालयातील जन्म नोंदी) रक्तनात्यातील वंशावळ सिद्ध करणारे पुरावे.२) सन १९५० पूर्वीचा रहिवासाबाबतचा महसूल पुरावा. (उदा. १९५० पूर्वीचा सातबारा उतारा अथवा ग्रामपंचायतीकडून मिळणारे घरठाण पत्रक (असेसमेंट उतारा).३) रेशन कार्ड, आधार कार्ड आणि एक छायाचित्र.या दाखल्यांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया :सन १९६७, १९६१ आणि १९५० ही वर्षे मानीव दिनांक पुरावा ग्राह्य धरले आहेत. या दिनांकांपूर्वी जो रहिवास पुरावा असेल, त्या संबंधित तहसील कार्यालयातील महा ई-सेवा केंद्रात अर्ज जमा करावा. (उदा. सातबारा अथवा घरठाण पत्रक जर, दुसऱ्या तालुक्यातील असेल आणि सध्या अर्जदार हा कोल्हापुरात राहत असेल, तर अर्जदारास सातबारा अथवा घरठाण पत्रक असलेल्या तालुक्यात अर्ज करावा लागतो.) हा दाखला मिळण्याची कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील मुदत ४५ दिवसांची, तर संपूर्ण राज्यात १५ दिवसांची मुदत आहे. आॅनलाइन अर्ज केल्यानंतर संंबंधित नायब तहसीलदार, तहसीलदार, प्रांत कार्यालयातील कार्यवाही, पडताळणी होऊन डिजिटल स्वाक्षरी झाल्यानंतर महा ई-सेवा केंद्रातून जातीचा दाखला मिळतो.नॉन-क्रिमिलेयर सर्टिफिकेट(उच्च उत्पन्न गटात नसल्याबाबतचा दाखला):आवश्यक कागदपत्रे :१) जातीचा दाखला२) आठ लाखांच्या आतील उत्पन्नाचा तहसीलदारांचा दाखला३) शाळा सोडल्याचा दाखला४) रेशन कार्ड, आधार कार्ड आणि एक छायाचित्रया दाखल्यासाठी महा ई-सेवा केंद्रात अर्ज करावा. हा दाखला मिळविण्यासाठी १५ दिवसांची मुदत आहे.उत्पन्नाचा दाखलाआवश्यक कागदपत्रे :१) उत्पन्नाचा तलाठ्यांचा दाखला, शहरातील असल्यास कसबा करवीर तलाठी कार्यालयातील उत्पन्नाचा दाखला२) नोकरी असल्यास (आयकर विवरणपत्र)३) शेती असल्यास (सातबारा)४) रेशन कार्ड, आधार कार्ड आणि एक छायाचित्रया दाखल्यासाठी महा ई-सेवा केंद्रात अर्ज करावा. हा दाखला मिळविण्यासाठी १५ दिवसांची मुदत आहे.डोमिसाइल (वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला)१) मूळ महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक२) शाळा सोडल्याचा दाखला३) १५ वर्षांचा रहिवास सिद्ध करण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे (वीज बिल, असेसमेंट उतारा, सातबारा आदी.)४) रेशन कार्ड, आधार कार्ड आणि एक छायाचित्र.च्या दाखल्यासाठी महा ई-सेवा केंद्राकडे अर्ज करावा. संबंधित दाखल मिळण्याची मुदत १५ दिवस आहे.या दाखल्यासाठी लागते प्रतिज्ञापत्रजातीचा दाखला आणि नॉन-क्रिमिलेयर सर्टिफिकेटसाठी प्रतिज्ञापत्र (अ‍ॅफिडेव्हिट), तर उत्पन्नाचा दाखला आणि डोमिसाइलसाठी स्व:घोषणापत्र (सेल्फ डिक्लरेशन) द्यावे लागते. त्याबाबतची प्रक्रिया महा ई-सेवा केंद्रात होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रGovernmentसरकार