शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

दत्तक गावात हरले तरी भाजपाचा विजय कसा ?, वडेट्टीवार यांचा भाजपाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 18:18 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये भाजपा समर्थिक सरपंचपदाच्या उमेदवारांचा पराभव झाला.

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये भाजपा समर्थिक सरपंचपदाच्या उमेदवारांचा पराभव झाला. ज्यांना आपले गाव राखता आले नाही ते जास्त ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा कसा काय करू शकतात, असा सवाल करीत विदर्भात काँग्रेसच आघाडीवर असून भाजपाने आधी गावनिहाय जिंकलेल्या सरपंचांची यादी जाहीर करावी, असे आव्हान काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी दिले.वडेट्टीवार म्हणाले, नांदेड, गुरुदासपूर, केरळ व आताच्या ग्रामपंचायत निकालाने भाजपाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विदर्भातील एकाही जिल्ह्यात भाजपा काँग्रेसच्या समोर नाही. राज्याचा विचार करता काँग्रेसला ९८२, राष्ट्रववादी काँग्रेसला ४०० , तर भाजपाला ६२७ ग्रामपंचायतीत विजय मिळाला आहे. शिवसेनेला १५१ व अपक्षा गटांनी २८९ ठिकाणी बाजी मारली आहे. भंडारा- गोंदिया जिल्ह्यात खा. नाना पटोले यांचा प्रभाव पडला नाही हे दाखविण्यासाठी भाजपाने तेथील निकालाची खोटी आकडेवारी दिली. आता मतदानासाठी व्हीव्हीपॅट लागत आहेत. त्यानंतर यांची परीक्षा मशीनची होती की मतांची हे स्पष्ट होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, आॅनलाईन अंमलबजावणीत शेतक-यांची फसवणूक केली. त्यामुळे शेतकरी उलटला व असे निकाल आले. आता कर्जमाफीचे अपयश झाकण्यासाठी दिवाळीपूर्वी १० लाख शेतक-यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. प्रत्यक्षात ५ टक्केही शेतक-यांना दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळालेली नाही. काही जिल्ह्यांमध्ये फक्त प्रातिनिधिक स्वरुपात शेतक-यांना चेक देण्यात आले आहेत. याशिवाय कर्जमाफीचे पैसे शेतक-यांच्या खात्यात जमा होताच ते बँकेतील कर्जाच्या खात्यात वळते होणार आहेत. बँकांनी तसे सॉफ्टवेअर विकसित केले आहेत. त्यामुळे या कर्जमाफीचा थेट फायदा शेतक-यांना होणार नाही, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला. जीएसटीमुळे व्यापारी खरेदीसाठी बाजार समित्यांकडे फिरकलेले नाहीत. घरूनच माल खरेदी करीत आहेत. सोयाबीनला फक्त २ हजार रुपये भाव दिला जात आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतक-यांची दिवाळी अंधारात गेली असल्याचा आरोप त्यांनी केला.प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, आदिवासी विकास विभागासाठी बजेटमध्ये १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यातून ५०० कोटी रुपये कर्जमाफीसाठी वळविण्यात आले आहेत. सुरुवातीला ८९ लाख शेतकºयांना कर्जमाफी मिळणार असल्याचे सांगितले जात होते. आता हा आकडा १० लाख शेतक-यांपर्यंत खाली आला आहे. आकडेवारी सारखी बदलली जात असल्यावर लोंढे यांनी आक्षेप घेतला.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसBJPभाजपा