शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भारतात बंदी असताना इराणमधून पंढरपुरात मेलामाईन आले कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 11:39 IST

राज्यातील अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी चक्रावले; मास्टर मार्इंडचा शोध सुरू

ठळक मुद्देसध्या इराण या आखाती देशातून मेलामाईनची तस्करी केली जातेभारतीय सीमारक्षक आणि अन्न व औषध प्रशासनाची यावर करडी नजरभारतात बंदी असताना इराणहून हा पदार्थ पंढरपूरपर्यंत पोहोचला, ही बाब अत्यंत गंभीर

राजकुमार सारोळे 

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील सुगाव भोसे येथील दूध केंद्रावर मारलेल्या छाप्यात सापडलेल्या मेलामाईनच्या साठ्यामुळे राज्यातील अन्न व औषध प्रशासन हादरले आहे. या पदार्थाला भारतात बंदी असताना इराणहून आयात कशी झाली, याचा शोध आता सुरू झाला आहे. 

अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी रात्री सुगाव भोसे येथील श्रीराम दूध केंद्रावर छापा मारून रसायन वापरून तयार करण्यात आलेले ६३८ लिटर कृत्रिम दूध व असे दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे विविध प्रकारचे २ हजार ७१९ किलो रसायन जप्त केले आहे. यामध्ये ५० किलो मेलामाईन आढळले आहे. मेलामाईन या रसायनाला भारतात उत्पादन व वापरास बंदी आहे. त्यामुळे इतर देशातून या पदार्थाची आयात करता येत नाही. असे असताना पंढरपुरात हे रसायन कुठून आले,   याचा शोध घेण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासन बंदी असलेल्या रसायनाचा खाद्यपदार्थांमध्ये वापर होऊ नये, यासाठी दक्ष असते. मेलामाईनच्या वापराबाबत खास दक्षता बाळगली जाते. महाराष्ट्रात दूध डेअरीचे प्रमाण जास्त असल्याने दुग्धजन्य पदार्थांवर लक्ष ठेवण्याच्या सक्त सूचना अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या आहेत. राज्यभरातून मेलामाईनचा वापर नाही, असा अहवाल असताना पंढरपुरात दूध भेसळीत हा पदार्थ आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

अशी होते दूध भेसळ- मेलामाईन पाण्यात टाकल्यावर दुधासारखे दिसते. श्रीराम दूध केंद्राचा चालक डॉ. चव्हाण कॅनमध्ये हे मिश्रण तयार करायचा. त्याला दुधासारखी चव येण्यासाठी दूध पावडर व इतर पदार्थ मिसळत असे. त्यानंतर चांगल्या १५ लिटर दुधात असे रसायनापासून तयार केलेले ४० लिटर मिश्रण टाकले जायचे. १५ लिटर दुधाला ५५ लिटर भेसळीचे दूध तयार करण्याचा. तो स्वत: जनावरांचा डॉक्टर असल्याने त्याला भेसळयुक्त दूध कसे बनवायचे याचे तांत्रिक ज्ञान असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे राऊत यांनी सांगितले. 

काय आहे मेलामाईन - मेलामाईन हे कार्बन, हायड्रोजन आणि नायट्रोजनचा फॉर्म्युला आहे. या तिन्हींचे मिश्रण तयार केल्यावर साइनामाईड या विषारी द्रव्याप्रमाणे हे काम करते. पण नायट्रोजनचे प्रमाण ६७ टक्के केल्यावर प्लास्टिक साहित्य निर्मितीस याचा उपयोग होतो. शोभेचे प्लास्टिक काम, फोम, बोर्ड, भांडी यासाठी या प्लास्टिकचा वापर शक्य आहे. पण फॉर्म्युल्यापासून बनविलेली पावडर खाद्यपदार्थात वापरली जाते. या पावडरला मेलामाईन असे संबोधले जाते. याच्या वापराने मानवाच्या किडनी, त्वचा व डोळ्यांवर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे मेलामाईनच्या वापरास भारतात बंदी असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी सांगितले. 

सध्या इराणवरून तस्करी - सध्या इराण या आखाती देशातून मेलामाईनची तस्करी केली जाते. त्यामुळे भारतीय सीमारक्षक आणि अन्न व औषध प्रशासनाची यावर करडी नजर आहे. असे असताना हा पदार्थ पंढरपूरपर्यंत पोहोचला, ही बाब अत्यंत गंभीर आहे. ज्याने हा पदार्थ डेअरीचालक डॉ. चव्हाण याला पुरविला त्याचे नाव निष्पन्न झाले आहे. त्याबाबत पोलिसांमध्ये सविस्तर तक्रार दिली आहे. पोलीस तपासात आता ही बाब स्पष्ट होईल, असे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरmilkदूधMilk Supplyदूध पुरवठाPandharpurपंढरपूर