शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे निलंबित १२ आमदार सभागृहात कसे? काँग्रेसचे नाना पटोले यांचा विधानसभेत सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 09:26 IST

निलंबनाची मुदत संपण्याअगोदरच ते सभागृहात उपस्थित कसे राहतात? कुठल्या नियमाने सभागृहात बसतात?, याकडे पटोेले यांनी लक्ष वेधले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजपच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित केलेले होते, मग आता ते विधानसभेत कसे काय येत आहेत, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी विधानसभेत केला.गिरीश महाजन, जयकुमार रावल, आशिष शेलार, डॉ. संजय कुटे, अतुल भातखळकर, हरीश पिंपळे, योगेश सागर, नारायण कुचे, बंटी भांगडिया, पराग अळवणी, राम सातपुते आणि अभिमन्यू पवार यांना निलंबित करण्यात आले होते. तथापि, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. असे असले तरी नेमके कशाच्या आधारे या सदस्यांना सभागृहात बसण्याची अनुमती देण्यात आली, असा प्रश्न पटोले यांनी केला.

निलंबनाची मुदत संपण्याअगोदरच ते सभागृहात उपस्थित कसे राहतात? कुठल्या नियमाने सभागृहात बसतात?, याकडे पटोेले यांनी लक्ष वेधले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. याप्रकरणी भाजप आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर काही आमदारांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभा उपाध्यक्षांकडे निवेदन देऊन आपली बाजू मांडली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील निकालाची घोषणा केली. त्यानंतर विधिमंडळातील पीठासीन अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींची मुंबईत भेट घेत निवेदन दिले होते. त्यावेळी या १२ आमदारांचे निलंबन मागे घेतल्याचे सांगण्यात आले होते. 

मुख्यमंत्री ठाकरे बसून बोलणारमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये बसून बोलणार आहेत. त्यासाठी विधान परिषद सभापती आणि विधानसभा उपाध्यक्षांनी त्यांना परवानगी दिली आहे.सूत्रांनी सांगितले की, बसून बोलण्याची परवानगी ठाकरे यांनी सभापती व उपाध्यक्षांकडे मागितली होती. त्यासाठी त्यांनी तब्येतीचे कारण दिले होते. ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. जास्त वेळ उभे राहून बोलण्यास डॉक्टरांनी त्यांना मनाई केल्याची माहिती आहे. नोव्हेंबर महिन्यात उद्धव ठाकरे यांना मानेच्या दुखण्याचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री गैरहजर होते. मुख्यमंत्री हजर राहू शकले नव्हते. त्यावर  विरोधकांनी सवाल उपस्थित केले होते.  

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन