शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गिरणी कामगारांसाठी घरांची सोडत २ डिसेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 02:43 IST

कोन येथे बांधण्यात आलेल्या २ हजार ४१७ सदनिकांची सोडत म्हाडातर्फे २ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता वांद्रे पूर्वेकडील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने गिरणी कामगारांसाठी पनवेल तालुक्यातील कोन येथे बांधण्यात आलेल्या २ हजार ४१७ सदनिकांची सोडत म्हाडातर्फे २ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता वांद्रे पूर्वेकडील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे.एमएमआरडीएतर्फे बांधण्यात आलेल्या प्रत्येकी १६० चौरस फुटांच्या दोन सदनिका (परिस्थितीनुरूप शक्य असलेली जोडघरे) याप्रकारे प्रत्येकी एका युनिटसाठी 6 लाख रुपये आकारून गिरणी कामगारांना वितरित करण्यात येणार आहेत.स्वान मिल कुर्ला/शिवडी या मिलच्या अर्जदारांना उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून या सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात येईल, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली.सोडतीत म्हाडाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या १ लाख ४८ हजार ७११ गिरणी कामगार/वारस यांच्या यादीमधून २०१२च्या सोडतीमध्ये यशस्वी झालेले अर्जदार, २०१२च्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांपैकी अंतिमत: अपात्र झालेल्या अर्जदारांऐवजी कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीमधील अर्जदार तसेच म्हाडाच्या मे-२०१६च्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांना या सोडतीतून वगळण्यात येत असून, उर्वरित अर्जदारांचा सोडत प्रक्रियेत समावेश असेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)