शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

House Between two States: स्वयंपाकघर तेलंगाणात तर बेडरूम महाराष्‍ट्रात; पाहा सीमेवरील अजब घर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 20:55 IST

House Between two States: महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवर पवार यांचे घर असून, ते दोन राज्यांमध्ये विभागले गेले आहे.

House Between two States: सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात मोठा सीमावाद सुरू आहे. या वादादरम्यान महाराष्‍ट्र आणि तेलंगाणा राज्यांच्या सीमेवर असलेल्या एका घराचीही चर्चा होत आहे. चर्चेचे कारण म्हणजे, हे घर दोन राज्यांमध्ये विभागले गेले आहे. घराचा अर्धा भाग महाराष्ट्रात तर अर्धा भाग तेलंगाणात आहे. 

पवार कुटुंबाचे घरदोन राज्‍यांमध्ये विभागलेल्या या घराचे स्वयंपाकघर तेलंगाणात तर बेडरूम आणि हॉल महाराष्‍ट्रात आहे. वाचून तुम्हाला वेगळं वाटेल, पण हे खरंय. तेलंगाणा आणि महाराष्‍ट्राच्या सीमेवर महाराजगुडा गाव असून, या गावात 10 खोल्यांचे घर आहे. या घरात पवार कुटुंबीय राहतात. या घराच्या चार खोल्या तेलंगाणात तर इतर चार महाराष्‍ट्रात आहेत.

अनेक दशकांपासून अशीच परिस्थितीया 10 खोल्यांच्या घरात उत्‍तम पवार आणि चंदू पवार अनेक वर्षांपासून राहतात. पवार कुटुंबात 13 सदस्य आहेत. 1969 मध्ये सीमावाद सुरू झाला आणि तेव्हापासून पवार यांचे घर आणि शेती दोन राज्यांमध्ये विभागली गेली. याबाबत उत्तम पवार म्हणाले की, आमचे घर दोन राज्यांमध्ये विभागले गेले आहे, पण आतापर्यंत यामुळे कोणताच वाद झाला नाही. पवार कुटुंब दोन्ही राज्यात प्रॉपर्टी टॅक्‍स भरतात. यामुळे त्यांना दोन्ही राज्यांच्या सरकारी योजनांचा लाभ मिळतो. 

14 गावांचा सीमावादANIच्या रिपोर्टनुसार, महाराष्‍ट्र आणि तेलंगाणा राज्याच्या सीमेवर वसलेल्या जीवती तहसील अंतर्गत येणाऱ्या 14 गावांचा वाद आहे. या 14 गावांमध्ये महाराजगुडा (Maharajguda village) देखील सामील आहे. हे गाव दोन राज्यांमध्ये विभागले गेले आहे. यातील अर्धा गावांवर महाराष्ट्राच तर अर्ध्या गावांवर तेलंगाणाचा अधिकार आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रTelanganaतेलंगणा