शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल व्यावसायिकांची करातून सूट देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2020 05:29 IST

राज्य सरकारला दिले पत्र । उद्योगाप्रमाणे वीज बिलाची आकारणी करावी

पुणे : कोरोनामुळे मागील दोन महिन्यांपासून हॉटेल व्यवसाय ठप्प असल्याने उद्योगाची आर्थिक घडी विस्कटली आहे. हॉटेल रूम रिकाम्या आहेत. या उद्योगाला सावरण्यासाठी उत्पादन शुल्क, वीज दर आणि महापालिका करामध्ये सवलत द्यावी, अशी मागणी पूना हॉटेलियर्स असोसिएशन्सचे अध्यक्ष शरण शेट्टी यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन घोषित केल्याने दोन महिन्यांपासून व्यवसाय ९० टक्के ठप्प आहे. रूम बुकिंग रद्द करण्यात आले असून, विविध व्यावसायिक परिषदा पुढे ढकलण्यातआल्या आहेत. शिवाय लग्नसमारंभ रद्द झाल्याने हॉटेल व्यवसायाचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, देखभालखर्च आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा बोजा कायम आहे, याकडे लक्ष वेधून शरण शेट्टी म्हणाले, की या कठीण काळात सरकारने हॉटेलला सवलती द्याव्यात. सरकारी पातळीवर हॉटेल क्षेत्राचा उल्लेख उद्योग असा केला जातो. मात्र, तशा सवलती दिल्या जात नाहीत. व्यावसायिक दराऐवजी उद्योगांच्या दराने विद्युत बिल देण्यास मान्यता द्यावी. उद्योग आणि व्यवसायांना लागू केलेली वीज दरवाढ मागे घ्यावी.

हॉटेलमधील मद्य परवान्याला वर्षासाठी ६ लाख ९४ हजार रुपये आकारले जातात. हॉटेलवरील निर्बंध उठविल्यानंतर व्यवसाय सुरळीत होण्यास किती कालावधी लागेल सांगता येत नाही. त्यामुळे मद्यावरील करामध्ये पन्नास टक्के सवलत दिली पाहिजे. मालमत्ता करातून २०२०-२१ या कालावधीसाठी सूट द्यावी. हॉटेल्सला केवळ उत्पादन शुल्क विभगाचा परवाना ग्राह्य मानावा. खासगी पार्टी अथवा भोजनावळीसाठी वेगळा परवाना घेण्याची अट काढून टाकावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्रपूना हॉटेलियर्स असोसिएशन्सच्या पत्राचा संदर्भ घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात हॉटेल उद्योगावरील करांमध्ये सवलत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच विजेचे बिल, अबकारी कर, मालमत्ता कर यातही हॉटेल उद्योगाला सवलत मिळावी. हॉटेल व्यवसायाला आवश्यक परवाने मिळण्याची प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

टॅग्स :hotelहॉटेलcorona virusकोरोना वायरस बातम्या