शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल व्यावसायिकांचा पुढाकार

By admin | Updated: May 19, 2016 02:29 IST

लोकमतच्या पुढाकाराने सुरू असलेल्या जलमित्र अभियानाची दखल शहरातील हॉटेल व्यावसायिक संघटनेने घेतली आहे.

पिंपरी : लोकमतच्या पुढाकाराने सुरू असलेल्या जलमित्र अभियानाची दखल शहरातील हॉटेल व्यावसायिक संघटनेने घेतली आहे. संघटनेचे सदस्य असलेल्या हॉटेल व्यावसायिकांची बैठक घेऊन प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाणी बचतीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. एवढेच नव्हे, तर त्यातील काही हॉटेल व्यावसायिकांनी प्रत्यक्ष कृतिशील पाऊलसुद्धा उचलले आहे. संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली हॉटेलमध्ये टेबलावर ठेवण्यात येणाऱ्या स्टँडीवर लगेच लक्ष जाईल. अशा ठिकाणी लोकमत जलमित्र अभियानाचे स्टिकर लावले आहेत. यासह अन्य उपाययोजना केल्या आहेत.लोकमत पिंपरी कार्यालयात हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची परिचर्चा घेतल्यानंतर हॉटेल व्यावसायिकांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव म्हणून तातडीने या अभियानाला प्रतिसाद दिला. असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी व अन्य पदाधिकाऱ्यांनी जलमित्र अभियान राबविण्याच्या सूचना सर्व सदस्यांना दिल्या. मोबाइलवर एसएमएस पाठवले. सुमित बाबर यांनी संभाजीनगर येथील त्यांच्या हॉटेलात ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी लोकमत जलमित्र अभियानाचे स्टिकर्स आणि पोस्टर्स लावून जनजागृतीचा प्रयत्न केला आहे. टेबलावर आवश्यक तेवढेच पाणी ठेवून पाण्याचा अपव्यय टाळला आहे. त्यांच्या पिंपळे सौदागरमधील हॉटेलात तर पक्ष्यांसाठी लाकडी घरटी तयार केली आहेत. पक्ष्यांना पाणी तसेच चारा ठेवला आहे. पिंपरीतील गणेश हॉटेलमध्ये गणेश कुदळे यांनी हॉटेलात प्रवेश करताच दिसून येईल अशा पद्धतीने जलमित्र अभियानाचे स्टिकर्स लावले आहेत. स्टिकर्स लावल्यामुळे ग्राहक आवश्यक तेवढेच पाणी वापराची दक्षता घेत आहेत. (प्रतिनिधी)> पाणी टंचाईच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले असल्याने प्रत्येकाने काटकसरीने पाणी वापरण्याचे धोरण अवलंबले पाहिजे. लोकमतचे जलमित्र अभियान हा स्तुत्य उपक्रम असून, अशा विधायक उपक्रमात आपलाही खारीचा वाटा असावा, या उद्देशाने पाणी बचतीच्या उपाययोजना राबविल्या आहेत. रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर किचन, तसेच भांडी धुण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी खर्च होते. पाणी काटकसरीने वापरावे, अशा सूचना हॉटेल कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. - सुमित बाबर>हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून दिले आहे. ग्राहकांकडून गरजेपेक्षा अधिक पाणी वापरले जाऊ नये, यासाठी टेबलावर ठेवण्यात येणारे ग्लास अर्धेच भरले जातात. पाणी मागितल्यास वेटर लगेच पाणी देतात. हॉटेल असोसिएशनचे सदस्य असलेल्या अन्य सहकाऱ्यांनासुद्धा पाणी बचतीची दक्षता घ्यावी, असे सुचविले आहे. - गणेश कुदळे