शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Cabinet Expansion: अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्ताराची आशा मावळली; मुख्यमंत्र्यांनी केले तात्पुरते 'खातेवाटप'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 10:56 IST

शिंदे गटातील आमदारांमध्ये सुरू असलेली चलबिचल, बच्चू कडू यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली नाराजी, यामुळे हिवाळी अधिवेशनाआधी विस्तार हाेईल, अशी जोरदार चर्चा होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:कडील खात्यांचे वाटप अधिवेशनाआधी अन्य मंत्र्यांकडे केल्याने, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आता मावळली आहे. यामुळे सत्ता स्थापनेच्या पाच महिन्यांनंतर तरी विस्तार हाेईल, याकडे डोळे लावून बसलेल्या आमदारांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. 

शिंदे गटातील आमदारांमध्ये सुरू असलेली चलबिचल, बच्चू कडू यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली नाराजी, यामुळे हिवाळी अधिवेशनाआधी विस्तार हाेईल, अशी जोरदार चर्चा होती. गुजरातच्या निवडणुकांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १२ डिसेंबर रोजी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला उपस्थित राहतील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही उपस्थित असतील आणि या दौऱ्यादरम्यानच मंत्रिमंडळ  विस्तारावर शिक्कामोर्तब होईल, असेही तर्क लढविले जात होते. मात्र,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील खात्यांचा कारभार अन्य मंत्र्यांकडे सोपविल्याने, आता अधिवेशनाआधी विस्ताराच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

अशी सोपविली खाती nपरिवहन आणि सार्वजनिक बांधकाम - शंभूराज देसाई nपणन - दादाजी भुसे nसामाजिक न्याय व विशेष साहाय्य - संजय राठोड nमृद व जलसंधारण - तानाजी सावंत nअल्पसंख्यांक विकास - अब्दुल सत्तार nपर्यावरण आणि सामान्य प्रशासन - दीपक केसरकरnमदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन - संदीपान भुमरेnमाहिती व जनसंपर्क - गुलाबराव पाटील

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन