शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्रात गुंडांना राजाश्रय; बेताल वक्तव्य, पत्रकारावरील हल्ले राज्याला शोभा न देणारे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 17:06 IST

विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

Vijay Wadettiwar, Maharashtra Budget Session 2024: छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संत महात्म्यांचा महाराष्ट्र अशी आपल्या राज्याची ओळख आहे. परंतु गेल्या दोन वर्षात घोटाळेबाजांचा, वसुलीचा, खोकेबाजांचा, पक्ष फोडोफोडीचा, गुंडांना राजाश्रय देणारा महाराष्ट्र, अशी राज्याची नवी ओळख करण्यात शिंदे सरकारने मोठी प्रगती केली आहे, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी हे आरोप केले.

वडेट्टीवार म्हणाले, "पुण्यात नवीन मुळशी पॅटर्न सुरू झालाय. या नव्या मुळशी पॅटर्नचे खरे आश्रयदाते कोण आहेत. याचा शोध सरकारने घेतला पाहिजे. आजी माजी नेत्यांमध्ये गुन्हेगार वापरण्यावरून वाद सुरू झाले आहेत. पुण्यातल्या गुंडांना क्राईम ब्रँचच्या काही सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे मार्गदर्शन आहे. हा सेवा निवृत्त अधिकारी नोकरीत असताना आणि नोकरीत नसतानाही पुण्यातल्या टोळ्या चालवतोय. राजकीय पदाधिकाऱ्यांना नेत्यांना धमकावण्यासाठी गुंडांना पॅरोलवर सोडले जातेय. पुण्यात 200 गुंडांची परेड करण्याची वेळ आली. हे दुर्देव आहे. पुण्यात अमितेश कुमारांनी गुंडांची परेड घेतली. त्यानंतर काही दिवसातच 2200 कोटींचे ड्रग्ज सापडले."

महाराष्ट्रात गुंडाराज सुरू!

"पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विचारंवत विश्वंभर चौधरी यांच्यावर केलेला हल्ला म्हणजे दहशत निर्माण करण्याचा प्रकार आहे. दहशत निर्माण करणारी ही तालिबानी वृत्ती आहे. पत्रकारांवर ही वेळ येत असेल तर राज्यात सुरक्षित आहे कोण हा खरा प्रश्न आहे. भाजप आमदाराच्या गोळीबारामुळे, मुख्यमंत्र्यांवरील आरोपांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली. हे इजा-बिजा-तिजा सरकार महाराष्ट्राला उद्धवस्त करेल, अशी परिस्थीती आहे. कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने चक्क वर्षा निवासस्थानी जावून भेट घेतली. याच मुख्यमंत्र्यांच्या काळात वर्षा निवासस्थानावर ड्रग प्रकरणातील आरोपीने गणपतीची आरती केली होती. याचा अर्थ महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे," असेही ते म्हणाले.

शिदे-फडणवीस-अजितदादांवर जोरदार टीका

"या सरकारने पोसलेले गुंड कंत्राटदारांना धमकावत आहेत. याबाबत कंत्राटदार संघटनांनी इतिहासात पहिल्यांदा तक्रार केली आहे. शासनाची विकासकामे राजाश्रय असलेल्या गुंडांकडून  बंद पाडली जात आहेत. सरकारमधील कोल्डवॉरची जागा शस्त्र घेतील. काही दिवसांनी यांची मजल एकमेकांवर बाँम्ब फेकण्यापर्यंत जाणार आहे. इतकी सत्तेची लालसा, हव्यास या इजा-बिजा-तिजा मध्ये भरली आहे. शिवसेनेचे नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. या हत्येमागे कुणाचा हात आहे हे शोधले पाहिजे. ठाणे जिल्ह्यात संकेत भोसलेच्या अपहरणानंतर त्याला बेदम मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला होता. जीव वाचविण्यासाठी पोलिस ठाण्यात संकेत धाव घेत होता. मात्र, पोलिसांनी ही घटना आपल्या परिसरात घडली नसल्याचे सांगून टाळाटाळ केली. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर संकेतचा जीव वाचू शकला असता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. हा संकेत मागसवर्गीय होता. मागासर्वीय तरूणाची ही अवस्था कोणामुळे झाली. याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. नागपुरात्या हत्यांच सत्र थांबत नाही. नागपुरात प्रेस फोटोग्राफरची हत्या झाली. गृहमंत्र्यांची कार्यक्षमता हरवली कुठे? मुख्यमंत्री मौनात आहेत. अजितदादांना काय बोलायच कळत नाही", अशी टोलेबाजी वडेट्टीवार यांनी केली.

ऑर्केस्ट्राच्या आडून डान्सबार सुरू

"महायुती सरकारचे गुंडांना अभय आहे. गुंडाकडून मंत्रालयात रिलबाजी केली जातेय आणि सामान्य माणूस मात्र मंत्रालयाबाहेर रांगेत उभा आहे. सत्ताधारी पक्षाचा नेता आई आणि मुलीवर बलात्कार करतो. त्यावर कोणी बोलत नाही या संपूर्ण प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे. मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्या आडून सर्रास डान्स बार चालवले जात आहेत. नियम धाब्यावर बसवून पहाटे पाचपर्यंत डान्सबार सुरू आहेत. मुंबईतील या डान्सबारना पोलीसांचा आशिर्वाद आहे. चिपळूणमध्ये सरकारच्या आशीर्वादाने बाहेरील गुंड मागवून राडा करण्यात आला. राडा संस्कृतीला सरकारकडून खतपाणी घातले जात आहे. त्यामुळे राज्यातली कायदा सुव्यस्था धाब्यावर आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला सत्ताधारी लोकप्रनिधींकडून वारंवार गालबोट लावले जात आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी वारंवार समाज विघातक कृत्ये करत असल्याने महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे. लोकप्रतिनीधी पोलीसांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरले जातात. हे दुर्दैव आहे," अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2024Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार