शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

राज्यातील ३ मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान, सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे गौरव : देशातल्या ११ विविध श्रेणीतील २२ जणांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 4:01 AM

सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते, देशातल्या ११ विविध श्रेणीतील २२ जणांना वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले.

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते, देशातल्या ११ विविध श्रेणीतील २२ जणांना वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यात सातारा जिल्ह्यातील मंगला बनसोडे, नागपूर जिल्ह्यातील डॉ. महादेवराव मेश्राम आणि कोल्हापूरच्या मनोरमा कुळकर्णींचा समावेश आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र आहे.लोककलेशी बनसोडे यांचे अतुट नातेपुण्याच्या जुन्नर तालुक्यात लोकनाट्य व लावणीला समर्पित कुटुंबात जन्मलेल्या मंगला बनसोडे यांच्या कुटुंबाची पाचवी पिढी या क्षेत्रात आहे. श्रीमती बनसोडे लावणी व तमाशा या लोककला माध्यमातून सातव्या वर्षापासून लोकजागृती व सामाजिक संदेश पोहोचवण्याचे काम केले आहे. पुरस्कार प्राप्तीनंतर, या कलेच्या माध्यमातून लावणीचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच सामाजिक संदेश सर्वदूर पोहोचवण्याचा प्रयत्न अखेरच्या श्वासापर्यंत आपण करणार आहोत, असे बनसोडे म्हणाल्या.डॉ. मेश्राम यांचे अतुलनीय योगदाननागपूरच्या उमरेड तालुक्यातील डॉ. महादेवराव मेश्राम यांना आरोग्य सेवेत अतुलनीय योगदान दिल्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.नागपूरच्या रॉबर्टसन मेडिकल स्कूलमधून आरोग्य सेवेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर १९५८ साली आरोग्य अधिकारी पदावर रूजू झालेल्या डॉ. मेश्राम यांनी दैनंदिन रुग्णसेवेबरोबर पूरग्रस्त व कुष्ठरोग्यांच्या सेवेचे विशेष उल्लेखनीय कार्य केले. महाराष्ट्र शासनाने १९८२ ते ८५ या कालखंडात त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी विशेष प्रशस्तीपत्रक देऊन पूर्वीच त्यांना सन्मानित केले आहे.क्रीडा क्षेत्रातील मनोरमा कुळकर्णीकोल्हापूरच्या मनोरमा कुळकर्णींनी महापालिका शाळेत ३५ वर्षे प्राथमिक शिक्षिकेची नोकरी केली. क्रीडा क्षेत्राची त्यांना विशेष रूची आहे.धावणे या क्रीडाप्रकारात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर १ रजत, २ कांस्य, राष्ट्रीय स्तरावर २५ सुवर्ण, ४ रजत, ३ कांस्य व राज्य स्तरावरील स्पर्धेत १३ सुवर्ण, २ रजत पदकांसह अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. याखेरीज १५00 मीटर्स मॅरेथॉनमधे विशेष नैपुण्य संपादन केले.निवृत्तीनंतरही धावणे या क्रीडाप्रकाराकडे त्यांनी विशेष लक्ष दिले व अनेकांना मार्गदर्शन केले. श्रीमती कुळकर्णी सध्या ७१ वर्षांच्या असून क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य व विशेष कामगिरीसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद