शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

होमिओपॅथिक डॉक्टरांचा राज्य शासनाला आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 19:30 IST

राज्याच्या सार्वजनिक सेवेत अथवा राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये होमिओपॅथिचा समावेश केला जात नाही. .

पुणे: होमिओपॅथिक शास्त्रास व डॉक्टरांना शासनाकडून सापत्नीक वागणूक दिली जाते. राज्याच्या सार्वजनिक सेवेत अथवा राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये होमिओपॅथिचा समावेश केला जात नाही. अनेकवेळा शासनाकडे विनंती करूनही शासन दुर्लक्ष करीत आहे. आयुष संचालनायातील उच्च पदस्थ असलेले अधिकारी,संचालक फक्त आयुर्वेदिक व युनानी पॅथीच्या विकासाची कामे करतात, असा आरोप करीत महाराष्ट्र होमिओपॅथिक डॉक्टर्स संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र होमिओपॅथिक डॉक्टर्स संघर्ष समितीच्या वतीने झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत होमिओपॅथिक डॉक्टरांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली. यामध्ये मुख्यत: डॉ. सावरीकर समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करणे, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदाच्या ५७१६च्या जागांना स्थगिती देऊन त्यांच्या मध्ये होमिओपॅथिक डॉक्टर्सचा समावेश करणे शासकीय सेवेत होमिओपॅथिक डॉक्टरांचा समावेश करणे, होमिओपॅथिचे स्वतंत्र संचालनालय सुरू करणे, होमिओपॅथिक चिकित्सकांना फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट मान्य करण्याचेआदेश बहाल करणे, शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे होमिओपॅथिक कॉलेज सुरू करणे, राष्ट्रीय आरोग्य योजनेतील बाल स्वास्थ योजना, वेलनेस सेंटर व कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदावर होमिओपॅथिक डॉक्टरांचा समावेश करणे,सर्टिफिकेट कोर्स ऑफ मॉडर्न फार्मकॉलॉजी डॉक्टरांची एम. एम. सी. मध्ये नोंदणी करणे इ.मागण्यांसाठी विविध होमिओपॅथिक डॉक्टरांच्या संघटनेकडून एकमुखी ठराव करण्यात आला. युतीचे शासन आल्यावर या पॅथीला न्याय मिळेल असे वाटत होते. परंतु याही सरकारने सीसीएमपी कोर्सच्या जागा व्यतिरिक्त काहीच केले नाही. नुकतेच मंत्री मंडळात समावेश झालेले  जयदत्त क्षीरसागर यांच्या  नेतृत्वाखाली आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून या शाखेच्या समस्यांविषयी चर्चा केली. परंतु पाहतो, तपासतो अशी शासकीय भाषेतील उत्तरे मिळाली. त्यामुळे शासन स्वत:हून पुढाकार घेऊन करील अशी आशा नसल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील होमिओपॅथिक डॉक्टर्स व विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करतील, त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यातील आमदार,खासदार व मंत्री याना घेराव घालून होमिओपॅथिक डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्याची जाणून करून देतील, त्याचबरोबर राज्य शासनाचे उच्च पदस्थ अधिकारी, सेक्रेटरी, संचालक हे होमिओपॅथी विरोधी भूमिका घेत असल्यामुळे त्यांना ही घेराव घालण्याचे ठरविले आहे. सुरुवातीला हे आंदोलन शांतता मागार्ने करणार असून, जर शासन याची दखल घेत नसेल तर हे आंदोलन तीव्र करून संपूर्ण महाराष्ट्रतील हाय वे बंद करू, असे केंद्रीय होमिओपॅथिक परिषदचे उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरStrikeसंप