शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गरज पडल्यास गृहनिर्माण विभागातर्फे १४ हजार घरे कोरोना रुग्णांसाठी वापरणार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 18:00 IST

कोरोनाच्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्याबरोबर त्यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी आता गृहनिर्माण विभागाने पावले उचलली आहेत. त्यानुसार या खात्याच्या अखत्यारीत असलेली १४ हजार घरे कोरोनासाठी उपलब्ध करुन देण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी केली.

ठाणे : कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना रूग्णांना आयसोलेट (विलगीकरण) आणि क्वारंटाईन करण्यासाठी गृहनिर्माण खात्याच्या ताब्यात असलेली सुमारे १४ हजार घरे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा आव्हाड यांनी केली. रूग्णांना आयसोलेट आणि क्वारंटाईन करण्यासाठी या घरांची मोठी मदत होणार आहे.                   महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. राज्याच्या आरोग्य खात्याने चोख कामिगरी बजावत अनेक ठिकाणी कोरोनावर उपचार करणाऱ्या रूग्णालयांची व्यवस्था केली आहे. कोरोनाविरोधातील या लढ्यात आता गृहनिर्माण खातेही ताकदीने उतरले आहे. देशातील सगळ्यात मोठा आयसोलेशन आणि क्वारंटाईन झोन महाराष्ट्राच्या गृहनिर्माण खात्याने उभा करण्याची तयारी केली आहे.रूग्णांना आयसोलेट किंवा क्वारंटाईन करण्यासाठी ही घरे सज्ज ठेवण्यात आली आहेत.                    सोमवारी त्यांनी सोशल डिस्टन्सींग ठेवत गृहनिर्माण खात्याच्या अधिकात्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला गृहनिर्माण विभागाचे अधिकारी अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर आणि म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, मुंबई बोर्डाचे अध्यक्ष राधाकृष्ण हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये आव्हाड यांनी प्रतिकूल परिस्थितीत गृहनिर्माण खाते काय काम करू शकते, याचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आव्हाड यांनी कोरोना रूग्णांना आरसोलेट तसेच क्वारंटाईन करण्यासाठी तत्काळ १४ हजार घरे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, जर रु ग्णालयांची कमतरता भासत असेल तर गृहनिर्माण विभागाने मुंबईकरांच्या आण िमहाराष्ट्राच्या हितासाठी या घरांची तयारी ठेवली आहे.या घरांचा रूग्ण क्वारंटाईन करण्यासाठी वापर करता येऊ शकेल. अगदीच वेळ हाताच्या बाहेर जायला आली तर अजून ह्यामध्ये १० हजार घरांची व्यवस्थाही करु शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस