शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

शितळादेवी मंदिराला सव्वाशे वर्षांचा इतिहास, विहिरीचा असाही उपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 02:14 IST

माहीम येथील शितळादेवी मंदिर हे मुंबईतील देवीच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. इ. स. १८९० ते १८९५ च्या दरम्यान स्थानिक कोळी बांधवांनी या मंदिराची स्थापना केली.

अक्षय चोरगे मुंबई : माहीम येथील शितळादेवी मंदिर हे मुंबईतील देवीच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. इ. स. १८९० ते १८९५ च्या दरम्यान स्थानिक कोळी बांधवांनी या मंदिराची स्थापना केली. मंदिर उभारल्यानंतर काही वर्षांनी आसपासची जमीन जी.एस.बी. मंदिर ट्रस्टने खरेदी केली आणि तेव्हापासून मंदिर ट्रस्टकडे आहे.कोळी बांधवांसह मंदिरात बंगाली बांधव मोठ्या संख्येने दर्शनाला येतात. तर सिंधी बांधव दसºयाच्या दिवशी लहान मुलांचे जायवळ काढण्यासाठी येतात. म्हणूनच शितळादेवी मंदिरात दसºयाला मोठी गर्दी असते. कोळी समाजातील कुटुंबात जन्माला आलेल्या मुलाला शितळादेवीच्या पायावर ठेवण्याची प्रथा आहे.देवीच्या दर्शनासाठी मंदिरातरांगा लागल्या, तरी योग्य नियोजनामुळे कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की होत नाही. सुरक्षेसाठी येथे पूर्णवेळ पहारेकरी आहेत. महाराष्ट्रपर्यटन विकास महामंडळातर्फे नवरात्रौत्सवादरम्यान मुंबईतील ज्या पाच मंदिरांचे दर्शन घडवले जाते, त्यातील एक म्हणजे शितळादेवी मंदिर. मंदिराचे आणि देवीचे नाव शितळादेवी आहे. परंतु लोकांनी त्याचा अपभं्रश करून शितलादेवी असे केले आहे, असे जुन्या जाणत्या व्यक्तींनी सांगितले. शितळादेवीची मूर्ती ही स्वयंभू आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. देवीसाठी सोन्याचा मुलामा दिलेलामुखवटा आहे.खोकला बरा करणारी खोकलादेवीशितळादेवी मंदिर परिसरात खोकलादेवीचेही एक प्रसिद्ध मंदिर आहे. खोकलादेवीचे दर्शन घेतल्यावर खोकल्याचा आजार बरा होतो अशी लोकांची श्रद्धा आहे.>मंदिराच्या शेजारी एक जुनी विहीर आहे. कोळी बांधवांच्या घरी लग्नकार्य असेल तर शुभ शकुन म्हणून या विहिरीतील पाणी नेतात. नवरदेवाच्या आंघोळीसाठीसुद्धा या विहिरीचे पाणी नेले जाते. विहिरीचे पाणी पिण्यायोग्य आहे, मात्र पालिकेने सर्व घरांमध्ये नळांची सुविधा दिल्याने विहिरीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर होत नाही.>मंदिरातील उत्सवमंदिरात अश्विन महिन्यात घटस्थापनेपासून दसºयापर्यंत दहा दिवस शारदोत्सव (नवरात्रौत्सव) साजरा केला जातो. तर माघ महिन्यात पहिल्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत माघी शारदोत्सव (माघी नवरात्रौत्सव) साजरा केला जातो. कुमारिका पूजन, पालखी सोहळा हे त्यापैकी मोठे सोहळे आहेत. या काळात दररोज सात हजारांहून अधिक भाविक दर्शनाला येतात.