शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नऊवारी साडीत रायगडावरील हिरकणी कडा सर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 03:07 IST

महिला वनपालाची चढाई; राज्यभरातील ५७ जणांचा मोहिमेत सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : वनविभागातील महिला वनपाल शीला बडे यांनी नऊवारी साडी नेसून रायगडावरील अवघड हिरकणी कडा सर केला. सोलापूर सामाजिक वनीकरण विभागात महिला वनपाल असलेल्या शीला बडे यांनी ‘हिरकणी’ हा सिनेमा पाहिला होता, तेव्हापासून त्यांनी हा कडा सर करायचा असा संकल्प केला होता. मुंबईच्या शिलेदार संस्थेने मोहीम जाहीर केल्यावर त्यांनी यात सहभाग नाेंदविला.

७ मार्चच्या या मोहिमेत राज्यभरातून ५७ जण सहभागी झाले, त्यात ३५ महिला होत्या. साडीमध्ये वनपाल बडे यांच्यासह महिला पोलीस मोनिका जाधव व अन्य एक जण सहभागी झाली होती. हा कडा सर केल्यानंतर बडे म्हणाल्या, जिथून फक्त पाणी खाली जाऊ शकते आणि वारा वर येऊ शकतो, असं वर्णन रायगडावरील हिरकणी कड्याचं करण्यात आलं आहे. साडेसात वाजता कडा चढाईची मोहीम सुरू झाली. हिरकणीवाडीपासून या कड्याची उंची ४,२६७ फूट आहे. साडेअकरा वाजता बुरुजावर पोहोचलो, असे त्या म्हणाल्या.

अन् अंगावर आले शहारे...हिरकणीने बाळाच्या ओढीने हा अवघड कडा कसा उतरला असेल याचा अनुभव या मोहिमेत घेता आला. केवळ एक पाय ठेवण्याइतपत जागा होती. सुरक्षेसाठी दोर होता म्हणून आम्ही पुढे जाण्याचे धाडस करीत होतो. पण, त्या हिरकणीने ही चढण कशी पार केली असेल याचा अंदाज घेताना अंगावर शहारे येत होते, असे बडे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरWomenमहिला