शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुजा समूह करणार ३५ हजार कोटींची गुंतवणूक; राज्य सरकारशी करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 06:07 IST

दोनच दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ उपसमितीने ७० हजार  कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या प्रकल्पांना मान्यता दिली होती. त्यानंतर गुरुवारी या मोठ्या गुंतवणुकीसाठी करार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हिंदुजा समूह राज्यात ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गुरुवारी यासंदर्भात राज्य सरकारशी करार करण्यात आला. ही गुंतवणूक प्रामुख्याने राज्यातील ग्रामीण भागाचा आर्थिक विकास आणि ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने केंद्रित असेल. 

दोनच दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ उपसमितीने ७० हजार  कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या प्रकल्पांना मान्यता दिली होती. त्यानंतर गुरुवारी या मोठ्या गुंतवणुकीसाठी करार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हिंदुजा ग्रुपचे जी. पी. हिंदुजा, अशोक हिंदुजा आणि प्रकाश हिंदुजा यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी आणि राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे उपस्थित होते. हा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी करार झाल्यानंतर सांगितले.

महाराष्ट्रातील लोकांसाठी संधी आणि रोजगार निर्माण करण्यासाठी, राज्याच्या ग्रामीण क्षेत्राच्या आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करून राज्यात आर्थिक प्रगती घडवण्यासाठी हा सामंजस्य करार केला जात असल्याचे हिंदुजा समूहातर्फे यावेळी सांगण्यात आले. २० अब्ज डॉलरचा वेदांत फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प, २२ हजार कोटी रुपयांचा टाटा एअरबस प्रकल्प, वैद्यकीय उपकरण प्रकल्प, बल्क ड्रग प्रकल्प यासह पाच महत्त्वाचे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत असताना या सरकारने हा महत्त्वाचा करार केला आहे.

गुंतवणूक कशात?प्रामुख्याने रिन्युएबल एनर्जी, माध्यम आणि मनोरंजन, ग्रामीण अर्थव्यवस्था विकास, सायबर सुरक्षा, व्यावसायिक ऑटोमोबाइल्स आणि सोल्युशन, बीएफएसआय, आरोग्य, पायाभूत सुविधा, उत्पादन आणि नव्या तंत्रज्ञान क्षेत्रात हिंदुजा समूह गुंतवणूक करणार आहे. यातून राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. गुंतवणुकीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आणि हिंदुजा समूहाबरोबर याचा पाठपुरावा करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीमध्ये राज्य सरकार आणि हिंदुजा समूहाच्या तज्ज्ञांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे