शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी, इंग्रजीतच उत्पन्नाचा दाखला सादर करण्याच्या अटीमुळे लाखो अल्पसंख्याक विद्यार्थिनी राहताहेत शिष्यवृ़त्तीपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 21:06 IST

केंद्रीय अल्पसंख्यांक विभागाने शिष्यवृत्तीसाठी केवळ हिंदी अथवा इंग्रजीतीलच उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आडमुठी भूमिका घेतल्याने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थीनीनी शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि आमदार नसीम खान यांनी केला.

मुंबई, दि. २६ - केंद्रीय अल्पसंख्यांक विभागाने शिष्यवृत्तीसाठी केवळ हिंदी अथवा इंग्रजीतीलच उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आडमुठी भूमिका घेतल्याने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थीनीनी शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि आमदार नसीम खान यांनी केला.केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक विभागाकडून मौलाना आझाद फाऊंडेशन योजने अंतर्गत, इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थीनींना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यासाठी संबंधित अधिका-यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला किंवा उत्पन्नाबाबत स्टँप पेपरवरील प्रतिज्ञा पत्र ग्राह्य धरले जात असे. यंदा मात्र, केवळ हिंदी किंवा इंग्रजी भाषेतील उत्पन्नाचा दाखला शिष्यवृत्तीसाठी ग्राह्य धरण्याबाबतचे परिपत्रक केंद्रीय अल्पसंख्याक विभागाने जारी केले आहे. केंद्र सरकारच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, पश्विम बंगाल आदी राज्यातील विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती मिंळविताना प्रचंड अडचण होणार आहे. या राज्यात आपापल्या राजभाषेतून उत्पन्नाचा दाखला दिला जातो. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे शिष्यवृत्तीसाठी प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरण्यात यावी, अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे.केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारने ही योजना सुरू केली होती. मात्र, २०१४ साली सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने आघाडी सरकारच्या काळातील योजनांमध्ये आडकाठी घालण्यास सुरुवात केल्याचा आरोप नसीम खान यांनी केला आहे. शिष्यवृत्तीसाठी हिंदी आणि इंग्रजीतील उत्पन्नाच्या दाखल्याची अट दूर करावी अशी मागणी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे केली आहे. तसेच, महाराष्ट्रात अल्पसंख्यांक विद्यार्थीनींना मराठीसोबतच इंग्रजीतून उत्पन्नाचा दाखला देण्याची व्यवस्था करण्याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे विनंती केल्याचे नसीम खान यांनी सांगितले.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीGovernmentसरकार