शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मी मुख्यमंत्री असताना स्वीकारलेला अहवाल हा...; त्रिभाषा सुत्रावरून उद्धव ठाकरेंचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 08:44 IST

मुख्यमंत्री तसे म्हणाले, त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य आहे, पण आम्ही हिंदीची सक्ती सहन करणार नाही. - ठाकरे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले असतानाच हिंदीची सक्ती आम्ही कोणत्याही परिस्थितीत लागू होऊ देणार नाही, असे उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री तसे म्हणाले, त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य आहे, पण आम्ही हिंदीची सक्ती सहन करणार नाही. मी मुख्यमंत्री असताना डॉ. माशेलकर समितीने दिलेला अहवाल हा माझ्या माहितीप्रमाणे उच्च शिक्षणाबाबतचा होता. तो अहवाल आमच्या मंत्रिमंडळाने स्वीकारला. त्याच्या अंमलबजावणीसाठी आम्ही कार्यगट स्थापन केला, पण त्याची एकही बैठक झाली नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.  

हिंदीभाषकांना मारहाण करणे योग्य नाही, त्याचे मी समर्थन करत नाही. राज्यात काही वेगळे घडले की युपी, बिहारची संस्कृती आली असे म्हटले जाते. तेही योग्य नाही. त्या राज्यातही अनेक चांगले लोक आहेत, असेही ते म्हणाले. विधिमंडळाच्या अधिवेशनाने सामान्यांची घोर निराशा केली. सत्ताधाऱ्यांचे समाजकारण नाही तर माजकरण दिसून आले, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

मराठीसाठी एकत्र आलो होतो, मराठीसाठी पुढेही एकत्र राहू‘मराठीसाठी आम्ही एकत्र आलो होतो’ असे राज ठाकरे यांनी अलिकडेच म्हटले आहे. त्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, होय! आम्ही मराठीसाठीच एकत्र आलो होतो, मराठीसाठी पुढेही एकत्र राहू.  निवडणुकीसाठी एकत्र यायचे का ते निवडणूक आल्यावर ठरवू. त्यावेळी चर्चा होऊ शकते, ती होईलच.

कर्जमाफीचा अभ्यास कशाला?शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत उपाय सुचविण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी समिती नेमली. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, की कर्जमाफीचा अभ्यास कशाला? आम्ही थेट कर्जमाफी दिली होती, अभ्यास वगैरे नाही केला. आताच्या सरकारची मानसिकता असेल तर लगेच कर्जमाफी द्या. राजकारणाचा इतका दीर्घ अनुभव असलेले सत्ताधारी अभ्यास कशाचा करत आहेत?

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेmarathiमराठी