शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरात हिमकण पारा खालावला : वेण्णा जलाशय परिसरात पांढरीशुभ्र चादर; पर्यटकांमध्ये कुतूहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:34 IST

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरात थंडीचा जोर वाढत चालला असून, बुधवारी पहाटे पर्यटकांना हिमकण पाहावयास मिळाले. दवबिंदू गोठल्याने वेण्णा जलाशय परिसरात हिमकणांची चादर पसरली होती.

महाबळेश्वर : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरात थंडीचा जोर वाढत चालला असून, बुधवारी पहाटे पर्यटकांना हिमकण पाहावयास मिळाले. दवबिंदू गोठल्याने वेण्णा जलाशय परिसरात हिमकणांची चादर पसरली होती. यंदाच्या हंगामात प्रथमच दवबिंदू गोठल्याने पर्यटकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. अनेक पर्यटकांनी निसर्गाचा हा अनोखा अविष्कार कॅमेऱ्यात कैद केला.

हिवाळा ऋतू सुरू झाल्यानंतर देशभरातील पर्यटकांचे लक्ष महाबळेश्वरकडे वळते. त्याला कारणही तसेच आहे. येथील वेण्णा जलाशय परिसरात दरवर्षी दवबिंदूंचे हिमकणात रुपांतर होते. जलाशय परिसरात सर्वत्र हिमकणांची पांढरीशुभ्र चादर पसरते. गेल्या अनेक दिवसांपासून तापमानात होणारे चढ-उतार होत पाहता दवबिंदू गोठण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मंगळवारी ही प्रतीक्षा संपली अन् पर्यटकांना हिमकण पाहावयास मिळाले.

बोटीमध्ये चढ-उतार करण्यासाठी वापरल्या जाणाºया जेटीवर ठिकठिकाणी हिमकण साचले होते. तसेच रस्त्याकडेला उभ्या असलेल्या गाड्यांच्या टपांवर तसेच झोपड्यांच्या छप्परांवरही हिमकणांची चादर पसरली होती. लिंगमाळा परिसरातील स्मृतीवन परिसर व रानफुलांवरही हिमकण पाहावयास मिळाले.

थंडीच्या हंगामात प्रथमच महाबळेश्वरात दवबिंदू गोठल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. दवबिंदू गोठल्याची माहिती मिळताच पर्यटकांची पावले पहाटे वेण्णा जलाशयाकडे वळाली. अनेकांनी निसर्गाचा हा अविष्कार आपल्या कॅमेºयात कैद केला. हिमकण गोळा करून फोटो काढण्याचा मोह पर्यटकांना आवरता आला नाही.पारा चार अंशांवर येताच दवबिंदू गोठण्याची प्रक्रियाडिसेंबर महिना सुरू झाला की महाबळेश्वरचे तापमान हळूहळू खालावते. शहराचे किमान तापमान जरी १२ ते १३ अंश सेल्सिअस असले तरी वेण्णा जलाशय व लिंगमळा परिसराचा पारा ३ ते ४ अंशांवर घसरतो. दवबिंदूंचे हिमकणात रुपांतर होण्यासाठी इतके तापमान पुरेसे आहे. मंगळवारी पारा खालावल्याने दवबिंदू गोठल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली. 

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसर