शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात झाले सर्वाधिक उलटे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 06:02 IST

योगेश बिडवई। लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनानंतरच्या टाळेबंदीची सर्वाधिक झळ असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना बसली असून रोजगाराअभावी मुंबई, ठाणे, ...

योगेश बिडवई।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनानंतरच्या टाळेबंदीची सर्वाधिक झळ असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना बसली असून रोजगाराअभावी मुंबई, ठाणे, पुण्यासह शहरी भागातून निमशहरी व छोट्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात उलटे स्थलांतर झाले असल्याचे एका अभ्यासातून पुढे आले आहे. संबंधित सर्वेक्षणात सहभागी झालेल्या उत्तरदात्यांपैकी मराठवाड्यातील ५३ टक्के कामगार गावी परतल्याचे अभ्यासातून समोर आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सार्वजनिक धोरण आणि लोकशाही शासन व्यवहार अभ्यास केंद्र आणि द युनिक फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत अभ्यास करण्यात आला. मागास-अविकसित जिल्ह्यांतील अर्थव्यवस्था रोजगार पुरवण्यासाठी सक्षम नसल्याने मजूर मोठ्या शहरांत विविध असंघटित क्षेत्रांत काम करतात. सहाव्या आर्थिक गणनेनुसार राज्यातील एकूण रोजगारांपैकी सुमारे ७0 टक्के रोजगार हा मुंबई व उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक या शहरी भागांतच केंद्रित झाला आहे. मात्र लोकसंख्येची घनता अधिक असल्याने हा भागच मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित बनल्याने ठप्प झाला.मुंबई, ठाणे परिसरातून गावी परतलेले सर्वाधिक कामगार कोकण आणि पुणे, सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.पुणे जिल्ह्यातून मराठवाड्यात सर्वाधिक कामगार परतले.शहरांमध्ये अनेकांना फुटकळ रोजगार मिळतो, ही वस्तूस्थिती कोरोनामुळे समोर आली. संरक्षित स्वरुपाचा रोजगार नसल्याने तो गेल्यावर लोकांना गावी परतले लागले. गावातही शेतीखेरीज इतर चांगल्या रोजगाराच्या संधी नाहीत. शहरी रोजगार हमी योजनेची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहेत. कामगारांना सामाजिक सुरक्षा देणे गरजेचे आहे.- प्रा. राजेश्वरी देशपांडे, राज्यशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमराठवाड्यातील स्थलांतरित आकडेवारी पाहता त्यातूनच येथील सामाजिक आणि आर्थिक अस्वस्थता समोर येते. शेतीक्षेत्रातील पेच आणि रोजगार संधीअभावी मागास जिल्ह्यातून स्थलांतर होत आहे. ग्रामीण भाग, शेतीच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. शहरी केंद्रित विकासाच्या विकेंद्रिकरणाची आवश्यकता आहे.- डॉ. विवेक घोटाळे, कार्यकारी संचालक, द युनिक फाउंडेशन, पुणे