शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कोरोना काळात सर्वाधिक गुंतवणूक; तब्बल एक लाख कोटींचे झाले सामंजस्य करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 14:00 IST

कोरोना काळात ऑनलाईन परवानग्या देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याचा फायदा..

ठळक मुद्देमाहिती उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची माहिती

पुणे : कोरोना काळातही राज्यामध्ये देशातील सर्वाधिक गुंतवणूक झाली असून तब्बल एक लाख कोटींचे सामंजस्य करार झाले आहेत. राज्यातील उद्योगविश्व गती घेत असून औद्योगिक निर्मिती 70 टक्क्यांपर्यंत पोचली आहे. या काळात ऑनलाईन परवानग्या देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याचा फायदा झाल्याची माहिती उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.

महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा कक्षाच्या (मैत्री) पुणे विभागाच्या व्हर्चुअल सुविधा कक्षाचे उद्घाटन डॉ. कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे कार्यकारी संचालक सुरेश लोंढे, उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे, उपचसंचालक अर्चना कोठारी यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कांबळे म्हणाले, या सुविधा कक्षाच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांच्या परवानग्या दिल्या जाणार आहेत. नवीन उद्योग सुरु करताना जवळपास 12 ते 13 प्रकारच्या विविध स्वरुपाच्या परवानग्या घ्यावा लागतात. त्यामध्ये  एमआयडीसी, पर्यावरण विभाग, आरोग्य विभाग, प्रदुषण नियंत्रण मंडळ आदी विभागांच्या परवानग्या लागतात. या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळू शकणार आहेत. मुंबईमध्ये मैत्रीचा राज्यस्तरीय कक्ष असून पुण्यात नवीन कक्ष सुरु करण्यात आला आहे. काही दिवसातच औरंगाबाद आणि नागपुरमध्येही हे कक्ष केले जाणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

यावेळी, सहसंचालक सुरवसे म्हणाले, कोरोना काळात उद्योजकांसोबत संपर्क ठेवण्यात तसेच त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यात अडचणी आल्या. त्यांच्यासोबत समन्वय प्रस्थापित करणे, उद्योजकांना मार्गदर्शन, अडचणी सोडविणे यासाठी या कक्षाचा उपयोग होणार आहे. या कक्षाद्वारे एक  ‘सपोर्ट सिस्टीम’ निर्माण होईल. तर, लोंढे यांनी उद्योजकता विकास केंद्र आणि मैत्री समन्वय याविषयी माहिती दिली. आभार प्रदर्शन उपसंचालक अर्चना कोठारी यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेInvestmentगुंतवणूकbusinessव्यवसायCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार