शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
4
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
5
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
6
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
7
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
8
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
9
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
10
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
11
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
12
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
13
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
14
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
15
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
16
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
17
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

Heat Wave Electricity: ऐन हिवाळ्यात उन्हाच्या झळा! वीजेची मागणी उच्चांकी; २३ हजार ७५ मेगावॅटचा विक्रमी पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 18:33 IST

राज्यात उन्हाच्या झळा हळूहळू वाढायला सुरवात झाली आहे. त्यामुळे विजेचा वापर वाढला आहे. सोबतच कृषिपंपांद्वारे विजेचा वापर देखील वाढला आहे.

मुंबई : मागणीनुसार वीजपुरवठा करण्याचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत उच्चांकी झेप घेत महावितरणने विक्रमी २३ हजार ७५ मेगावॅट विजेचा पुरवठा केला आहे. 

मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित भागात व महावितरणच्या कार्यक्षेत्रात आजवरच्या या सर्वाधिक मागणीप्रमाणे चोख नियोजनातून वीजपुरवठा करून महावितरणने वीजपुरवठ्याचा आजवरचा नवा विक्रमी टप्पा गाठला आहे. याआधी ९ मार्च २०२१ रोजी २२ हजार ३३९ मेगावॅट विक्रमी विजेचा पुरवठा करण्यात आला होता. 

राज्यात उन्हाच्या झळा हळूहळू वाढायला सुरवात झाली आहे. त्यामुळे विजेचा वापर वाढला आहे. सोबतच कृषिपंपांद्वारे विजेचा वापर देखील वाढला आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून विजेच्या मागणीत सातत्याने वाढ सुरु आहे. यामध्ये मंगळवारी राज्यात मुंबईसह तब्बल २५ हजार ९५५ मेगावॉट विजेची मागणी नोंदविण्यात आली.

मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात महावितरणकडून सुमारे २ कोटी ८१ लाख ग्राहकांना आजवरच्या उच्चांकी २३ हजार ७५ मेगावॅट विजेचा सुरळीत व अखंडित पुरवठा करण्यात आला. विजेची ही विक्रमी मागणी पूर्ण करताना राज्याच्या कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करण्यात आले नाही. महावितरणने आतापर्यंत केलेल्या वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण व विस्तारीकरणासोबतच दैनंदिन देखभाल व दुरुस्तीच्या कामाचे हे यश आहे. त्यामुळे तब्बल २३ हजार मेगावॅटपेक्षा अधिक क्षमतेच्या विजेचे वहन सध्या अस्तित्वात असलेल्या वीजयंत्रणेमधून शक्य झाले आहे.

महावितरणने दीर्घकालीन वीजखरेदी करार असलेल्या वीजनिर्मिती कंपन्यांकडून त्यात सर्वात जास्त महानिर्मिती ६ हजार ८७४ मेगावॅट, एनटीपीसी व एनपीसीआयएलकडून एकूण ४ हजार १५४ मेगावॅट तसेच अदानी पॉवर, रतन इंडिया, सीजीपीएल, जेएसडब्लू, साई वर्धा, एम्पो या खासगी प्रकल्पांमधून ४ हजार ८५३ मेगावॅट वीज उपलब्ध झाली आहे. सोबतच नवीन व नवीकरणीय ऊर्जेच्या स्त्रोतांमधून सौर ऊर्जा- २३३५ मेगावॅट, पवन ऊर्जा- १६६ मेगावॅट तसेच सहवीजनिर्मिती प्रकल्पांतून १२०० मेगावॅट असे एकूण ३ हजार ९९१ मेगावॅट वीज उपलब्ध झाली.  उर्वरित विजेची मागणी ही कोयना, घाटघर व इतर जलविद्युत प्रकल्पांतून १ हजार ३२० मेगावॅट वीजनिर्मिती करून तसेच मुक्त ग्राहक व रेल्वेच्या वीजनिर्मिती स्रोत्रातून १ हजार ३५३ मेगावॅट आणि पॉवर एक्स्चेंजमधून ६३० मेगावॅट विजेची खरेदी करून पूर्ण केली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज