शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

हायकोर्टाच्या आदेशाने उघडणार ‘कंट्री लीकर’चे कुलूप, महिलांचा विरोध कायम, जिल्हाधिका-यांना कारवाईचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 18:41 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या नव्या आदेशानुसार यापूर्वी बंद करण्यात आलेली देशी दारुविक्री (कन्ट्री लिकर) दुकानांचे कुलूप जिल्हाधिका-यांनी स्वत:च्या देखरेखीत उघडावे, याबाबतचे पत्र धडकले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४५ देशी दारू दुकाने पुन्हा उघडणार आहेत. मात्र, देशी दारू विक्रीची बंद झालेली दुकाने पुन्हा उघडली जाऊ नयेत, यासाठी महिलांचा विरोध कायम आहे. 

अमरावती - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या नव्या आदेशानुसार यापूर्वी बंद करण्यात आलेली देशी दारुविक्री (कन्ट्री लिकर) दुकानांचे कुलूप जिल्हाधिका-यांनी स्वत:च्या देखरेखीत उघडावे, याबाबतचे पत्र धडकले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४५ देशी दारू दुकाने पुन्हा उघडणार आहेत. मात्र, देशी दारू विक्रीची बंद झालेली दुकाने पुन्हा उघडली जाऊ नयेत, यासाठी महिलांचा विरोध कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील सर्वप्रकारच्या दारूविक्री दुकानांना कुलूप लागले होते. मात्र, हे आदेश महापालिका हद्दीत लागू होत नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेच एका याचिकेवर सुनावणी करताना दिला आहे. त्याअनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात मद्य व्यावसायिकांनी सादर केलेल्या याचिका निकाली निघाल्या आहेत. त्यानुसार देशी दारू विक्र ीची दुकाने वगळता मद्यविक्रीची अन्य दुकाने आधीच सुरू झाली आहेत. राज्य शासनाच्या गृह विभागाने देशी मद्य नियम, १ सप्टेंबर २०१७ नुसार देशी दारूविक्री परवानाधारकांना काही सुधारणा करण्यासाठी नोटीस बजावली होती. यात देशी दारूविक्री दुकानांचा २५ चौरस मीटर परिसर, पार्किंगसाठी पुरेशी व्यवस्था, जागेचे मंजूर वाणिज्य अकृषक वापराचे परवाने, नगररचना अधिका-यांकडून मंजूर बांधकाम दाखला, अशा अटी लादल्या होत्या. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नोटीसविरोधात देशी दारूविक्रेत्यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. राज्य शासनाची नवीन नियमावली देशी दारूविक्रेत्यांनाच का, याबाबत हायकोर्टात दाद मागण्यात आली. याचिकेवर सुनावणी देताना न्या.बी.पी.धर्माधिकारी व न्या.अरूण उपाध्ये यांनी १२ सप्टेंबर २०१७ रोजी देशी दारूविक्रेत्यांना बजावलेल्या नोटीसला ‘स्टे’ देऊन दुकाने सुरू करण्याचे आदेश दिलेत. याबाबत पुढील सुनावणी २६ सप्टेंबर रोजी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी देशी दारुविक्रीची दुकाने पूर्ववत सुरू करण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ४५ देशी दारुविक्री दुकानांचे कुलूप उघडले जाईल. दारुविक्रेत्यांना महिलाशक्ती आणि दारूमुक्तीसाठी एकवटलेल्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दारुविक्री दुकानांना वाढता विरोध बघता पोलीस प्रशासनवर ताण वाढत आहे, हे विशेष.