शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेंना कुठल्याही क्षणी अटक, देशाबाहेर जाण्याची ‘पळ’वाट रोखण्याचे हायकोर्टाचे आदेश

By यदू जोशी | Updated: February 16, 2018 13:34 IST

पुण्यातील प्रख्यात बिल्डर डी.एस.कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांची अटकपूर्व जामिनासाठीची सगळी धडपड आता संपुष्टात आली असून त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.

मुंबई - पुण्यातील प्रख्यात बिल्डर डी.एस.कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांची अटकपूर्व जामिनासाठीची सगळी धडपड आता संपुष्टात आली असून त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. ते दोघे देशाबाहेर पळून जाऊ नयेत म्हणून विमानतळ प्राधिकरणास हायअ‍ॅलर्ट जारी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या.साधना जाधव आज केंद्र सरकारला दिले.घरांसाठी पैसे भरणा-या ग्राहकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप असलेले डी.एस.कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात काही कोटींची रक्कम जमा करण्याचा दिलेला शब्द पाळला नाही. बुलडाणा अर्बन बँकेला आपल्या कंपनीची एक जमीन विकण्याच्या व्यवहारात आपल्याला १२.५० कोटी रुपये मिळणार असून ते आपण उच्च न्यायालयात जमा करु, असे डी.एस.कुलकर्र्णींच्या वतीने दोनच दिवसांपूर्वी न्यायालयात सांगण्यात आले होते. त्याचा पुरावा म्हणून १२.५० कोटी रुपयांच्या डिमांड ड्राफ्टची फोटोकॉपीही दाखविण्यात आली होती. तथापि, ही जमीन सुविधा क्षेत्रासाठी राखीव असून तिच्यावर आधीच बँक आॅफ महाराष्ट्रच्या पुणे येथील एका शाखेतून कर्ज घेण्यात आले असल्याचे पोलीस तपासात पुढे आले.सिंगापूरच्या प्रभुणे कंपनीचे मालक दिलीप प्रभूणे हे आपल्याला ८० लाख अमेरिकन डॉलरची मदत देणार आहेत ते आपण न्यायालयात जमा करू असेही कुलकर्णी यांनी आधी उच्च न्यायालयास सांगितले होते. प्रभुणे यांनी तसे शपथपत्र न्यायालयात दाखल केले होते. तथापि, तेही शक्य होऊ शकले नाही. प्रभूणे यांनी न्यायालयाची फसवणूक व खोटे शपथपत्र दिल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची नोटीसही न्या.साधना जाधव यांनी आज जारी केली. एक्झेरिया कंपनीचा ५० कोटी रुपयांचा चेकही कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयास दाखविला होता पण तोही जमा केला नाही. ज्या बँक खात्याचा हा चेक होता त्यात केवळ ९६ लाख रुपयेच जमा असल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते. सरकारच्या वतीने अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडली.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी