शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वासना नाही तर ते प्रेम होते! १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्याला उच्च न्यायालयाकडून जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 12:42 IST

२६ वर्षीय आरोपीला जामीन मिळाला आहे.

प्रेम प्रकरणातून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे ही वासना नसून ते प्रेम होते असे निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवले. याप्रकरणी २६ वर्षीय आरोपीला जामीन मिळाला आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी सांगितले की, संबंधित आरोपीने प्रेमसंबंधातून पीडितेसोबत संबंध ठेवले आहेत, त्यामुळे याला वासना म्हणता येणार नाही. तसेच है लैंगिक अत्याचाराचे प्रकरण नाही. दोघांनीही प्रेमसंबंधातून हे कृत्य केले होते. 

१३ वर्षीय पीडित तरूणीच्या वडिलांनी आरोपी नितीन ढाबेरावविरुद्ध गु्न्हा दाखल केला होता. चार वर्षांपूर्वी मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप त्यांनी केला. खरं तर २३ ऑगस्ट २०२० रोजी पीडित मुलगी पुस्तके आणण्यासाठी घरातून गेली पण घरी परतलीच नाही. त्यामुळे आपली मुलगी हरवली असल्याची तक्रार वडिलांनी केली. तक्रारीनंतर अल्पवयीन मुलीला शोधण्यात पोलिसांना यश आले. आरोपी नितीनचे आपल्यावर प्रेम असल्याची कबुली पीडितेने दिली होती. २२ ऑगस्ट रोजी ती तिच्या आजीच्या घरी गेली असता तिथे आरोपी नितीनने तिला लग्नाचे आश्वासन दिले होते. 

उच्च न्यायालयाकडून जामीन दरम्यान, नितीनने लग्नाचे आश्वासन दिल्यानंतर पीडित तरूणी त्याच्यासोबत घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन निघून गेली. दोघांनी महाराष्ट्राबाहेर जाऊन अनेक ठिकाणी मुक्काम केला. अल्पवयीन मुलीने ही माहिती दिल्यानंतर अमरावतीच्या सुर्जी पोलीस ठाण्यात आरोपी नितीनविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण कोर्टात पोहचले, जिथे आरोपी नितीनच्या वकिलांनी अल्पवयीन तरूणी आरोपीसोबत स्वखुशीने गेली असल्याचे सांगत जामीनासाठी अर्ज केला. पण, अल्पवयीन मुलीची संमती नव्हती असे सांगत पीडितेच्या वकिलांनी जामीन फेटाळण्याची मागणी केली. 

वासना नाही तर ते प्रेम होते!याप्रकरणी सुनावणी देताना न्यायमूर्ती जोशी-फाळके यांनी सांगितले की, तपासाअंती असे स्पष्ट झाले की, पीडितेने स्वत:च्या इच्छेने घर सोडले होते. मित्राकडून पुस्तक घेण्याचा बहाणा करून ती घराबाहेर पडली अन् परतली नाही. तिने आरोपीसोबत राज्याची सीमा ओलांडली. तसेच पीडितेने तिच्या जबानीत आरोपीसोबत तिचे प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे. "पीडितेच्या सांगण्यावरून असे दिसते की, तिने आरोपीसोबत अनेक ठिकाणी मुक्काम केला पण कुठेही तक्रार केली नाही. एकूणच संबंधित पीडिता प्रेमप्रकरणातूनच आरोपीसोबत गेली होती हे स्पष्ट होते", असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. 

तसेच न्यायाधीशांनी सांगितले की, आरोपीला कारागृहात ठेवून काहीही साध्य होणार नाही... हे प्रकरण २०२० मधील असून प्रकरणाचा अंतिम निकाल लागण्यास वेळ लागेल. आरोपी आणि पीडित तरूणी प्रेमप्रकरणातूनच एकत्र आले होते. याप्रकरणी आरोपत्र दाखल करण्यात आले आहे. पण, आताच्या घडीला आरोपीला कोठडीत ठेवणे उचित ठरणार नाही.  

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टsex crimeसेक्स गुन्हाLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCourtन्यायालय