शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची ३३ पदे रिक्त, १५ कायम व १८ अतिरिक्त पदांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 06:30 IST

High Court : मे महिन्यात ४७ कायम व १५ अतिरिक्त असे एकूण ६२ न्यायमूर्ती कार्यरत होते, तर कायम न्यायमूर्तींची २४ व अतिरिक्त न्यायमूर्तींची ८ अशी एकूण ३२ पदे रिक्त होती.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तींची ३३ पदे रिक्त आहेत. त्यात १५ कायम न्यायमूर्ती, तर १८ अतिरिक्त न्यायमूर्ती पदांचा समावेश आहे. ही माहिती केंद्रीय न्याय विभागाद्वारे जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात कायम न्यायमूर्तींची ७१ व अतिरिक्त न्यायमूर्तींची २३ अशी एकूण ९४ पदे मंजूर आहेत. परंतु, सध्या या न्यायालयात ५६ कायम व ५ अतिरिक्त असे केवळ ६१ न्यायमूर्ती कार्यरत आहेत. प्रलंबित प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेता रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे विधि क्षेत्रात बोलले जात आहे.

मे महिन्यात ४७ कायम व १५ अतिरिक्त असे एकूण ६२ न्यायमूर्ती कार्यरत होते, तर कायम न्यायमूर्तींची २४ व अतिरिक्त न्यायमूर्तींची ८ अशी एकूण ३२ पदे रिक्त होती. दरम्यान, न्यायमूर्ती झेड. ए. हक सेवानिवृत्त झाले. तसेच, १० अतिरिक्त न्यायमूर्तींची सेवा कायम करण्यात आली. 

५.५३ लाख प्रकरणे प्रलंबितमुंबई उच्च न्यायालयात सध्या ५ लाख ५३ हजार ४६६ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यात ४ लाख ६२ हजार ५५४ दिवाणी तर, ९० हजार ९१२ फौजदारी प्रकरणांचा समावेश आहे. त्यातील १ लाख ४ हजार ६९४ दिवाणी व १४ हजार ८ फौजदारी अशी एकूण १ लाख १८ हजार ७०२ प्रकरणे १० वर्षांहून अधिक जुनी आहेत.

रिक्त पदे तातडीने भरावीप्रकरणे दाखल होण्याच्या तुलनेत निकाली निघण्याचा वेग कमी आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत पीडित नागरिकांना वेळेत न्याय मिळण्यासाठी न्यायमूर्तींची रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. न्यायालय पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यास न्यायदानाची गती वाढेल.- ॲड. पुरुषोत्तम पाटील, उपाध्यक्ष, उच्च न्यायालय विधिज्ञ संघटना, नागपूर 

टॅग्स :Courtन्यायालय