शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणार - हेमंत नगराळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 07:19 IST

हेमंत नगराळे यांनी बुधवारी सायंकाळी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. ते मुंबईचे ७५ वे पाेलीस आयुक्त आहेत. या वेळी नगराळे यांच्या स्वागतासाठी सर्व सहआयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त विशेष शाखा पोलीस आयुक्त कार्यालयात हजर होते.

मुंबई: मुंबई पोलीस सध्या कठीण समस्येतून जात आहेत. परिस्थिती हाताळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी नियुक्ती केली असून, सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले. तसेच पोलिसांनीही असे कृत्य करू नये जेणेकरून पोलिसांच्या प्रतिमेला डाग लागेल; अन्यथा कडक कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला. (Hemant Nagarale will try to improve the tarnished image of Mumbai Police)हेमंत नगराळे यांनी बुधवारी सायंकाळी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. ते मुंबईचे ७५ वे पाेलीस आयुक्त आहेत. या वेळी नगराळे यांच्या स्वागतासाठी सर्व सहआयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त विशेष शाखा पोलीस आयुक्त कार्यालयात हजर होते. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांना सांगितले की, ‘सचिन वाझे प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा, दहशतवाद विरोधी पथक योग्य तपास करत असल्याची खात्री आहे. या प्रकरणात पोलीस दलातील जे कोणी दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सहआयुक्तांकडून वाझेंनी तपास केलेल्या गुह्यांचा आढावा घेण्यात येईल. अधिक माहिती घेत पुढील कारवाई करू. आता तपासाबाबत बोलणे योग्य नाही.’ एकाने चूक केली म्हणून संपूर्ण पोलीस दल चुकीचे नसते. मुंबई पोलीस एका कठीण समस्येतून जात आहेत. समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने माझी नियुक्ती केली आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी पोलीस दलातील सर्व सहकाऱ्यांंचे सहकार्य लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत सर्व आव्हानांना तोंड दिले. नैसर्गिक आपत्तीत जीव धोक्यात घालून कार्य केले आहे. त्यामुळे कोणीही मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला डाग लागेल, असे कृत्य करू नये. नेहमी चांगले काम करा. वरिष्ठांनीही सर्व हालचालींवर लक्ष ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :Policeपोलिसsachin Vazeसचिन वाझेMumbaiमुंबई