शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानाच्या वापराने हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषांचा विकास शक्य - राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 23:37 IST

जगातील अनेक भाषा संकटात असताना हिंदीची वाढ होत आहे. मातृभाषेतून देण्यात आलेले ज्ञान सुलभरीत्या समजते. त्यामुळे आपल्याला तंत्रज्ञानाचा अवलंब करून हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन द्यावे लागेल.

मुंबई : जगातील अनेक भाषा संकटात असताना हिंदीची वाढ होत आहे. मातृभाषेतून देण्यात आलेले ज्ञान सुलभरीत्या समजते. त्यामुळे आपल्याला तंत्रज्ञानाचा अवलंब करून हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन द्यावे लागेल. त्यामुळे त्यांचा विकास होईल, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी शनिवारी केले. केंद्र शासनाच्या राजभाषा संचालनालयामार्फत राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स कॉलनी येथे आयोजित पश्चिम व मध्य क्षेत्रांचे राजभाषा संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी राजभाषा विभागाचे सचिव प्रभास कुमार झा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. हिंदी ही केवळ एक भाषा नसून संस्कृती आहे, असे सांगून राज्यपाल म्हणाले, देशातील एकात्मता आणि कार्यक्षमता राखण्यासाठी हिंदीचे योगदान महत्त्वाचे आहे. विनोबा भावे यांनी भूदान आंदोलनाच्या यशस्वीतेचे श्रेय हिंदीला दिले. महात्मा गांधींनी देशाच्या एकात्मतेसाठी राजभाषेचा आग्रह धरला. त्यामुळे हिंदी बोलण्याचा संकोच बाळगू नये.प्रभास कुमार झा म्हणाले, राजभाषा विभागाने देशातील १४ भाषांतून सोप्या पद्धतीने हिंदी शिकण्यासाठी ‘लीला’ मोबाइल अ‍ॅप सुरू केले आहे. या कार्यक्रमात शासकीय मध्य विभाग आणि पश्चिम विभागातील केंद्र शासनाचे विविध विभाग, सार्वजनिक उपक्रम, राष्ट्रीयीकृत बँका आदींना कामकाजात हिंदीचा अवलंब केल्याबद्दल २०१७साठीचा ‘राजभाषा पुरस्कार’ राज्यपालांच्या हस्ते दिला.सांस्कृतिक कार्य विभागाने मागे राहू नयेमातृभाषा चांगल्या प्रकारे येत असल्यास इतर भाषा शिकणे सोपे जाते. यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेणाºया मुलांनी आपल्या भाषेविषयी न्यूनगंड बाळगू नये, असे आवाहन राज्यपालांनी केले. आज चीन, कोरियासारख्या देशांना जुन्या उत्कृष्ट मराठी चित्रपटांच्या पटकथांविषयी कुतूहल असताना सांस्कृतिक कार्य विभागानेही यात मागे न राहता हिंदीमध्ये रूपांतरण करण्याचे काम करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र